Tuesday, 12 August 2025

"सिद्धार्थ महाविद्यालय, संशोधन केंद्राच्या 'सोनाली शिराळकर' यांना विद्यावाचस्पती (Ph. D.) पदवी जाहीर" !!

"सिद्धार्थ महाविद्यालय, संशोधन केंद्राच्या 'सोनाली शिराळकर' यांना विद्यावाचस्पती (Ph. D.) पदवी जाहीर" !!

सिद्धार्थ महाविद्यालय, संशोधन केंद्राच्या, संशोधक विद्यार्थीनी *सोनाली शिराळकर-ताटकर* यांना शनिवार, दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाकडून वाणिज्य व व्यवस्थापन विषयात विद्यावाचस्पती (Ph. D.) या उच्च शिक्षण क्षेत्रातील मानाची पदवी जाहीर करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय होता *'मुंबईतील महिला पोलिसांची स्टेन्त्स, विकनेसेस, ऑपारच्युनिटीज व चॅलेंजेसचे (SWOC) विश्लेषण'* या संशोधनासाठी त्यांनी गेल्या पाच वर्षापासून प्राध्यापक, डॉ. विष्णू ज. भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली मनापासून मेहनत घेतली होती.

त्यांच्या या संशोधनाच्या प्रवासाची सुरवात‌ सन २०१९पासून झाली. संशोधनाचा विषय महिला पोलिसांचा असल्यामुळे विवीध पदांवर कार्यरत असलेल्या बहूतांशी‌ महिला व काही पुरूष पोलिसांना प्रत्यक्ष भेटून प्रश्नावलीद्वारे किमान ५०० पोलिसांची माहिती मिळवणे हे खूपच आव्हानात्मक काम‌ होते. संशोधनाचा विषय व प्रमुख उद्दिष्टे जरी महिला पोलिसांचे सामर्थ्य‌, संधी‌, आव्हाने व त्यांचे कच्चे दुवे‌ तपासणे हा असला‌ तरी त्यांच्या पुरुष पोलिस‌ सहकार्यां कडून देखिल निष्पक्षपणे त्याचे‌ विश्लेषण करणे हासुद्धा त्यांच्या संशोधनाचा एक महत्वाचा हेतू होता. तसेच त्यांच्यासमोरील वर्क-लाईफ बॅलन्सची आव्हाने, तसेच पोलीस सेवेच्या शासकीय धोरणांचा अभ्यास करणे हीदेखिल‌ संशोधनाची महत्वाची उद्दिष्टे होती.

सुरवातीला मुंबई व उपनगरातील विवीध पोलीस स्टेशन प्रभारीकडून‌ त्यांच्या अखत्यारीत पोलीसांकडून माहीती मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाकडून  संमतीपत्राची मागणी केली जायची, तसेच प्रश्नावलीतील काही प्रश्न पोलिसांना विचारू नयेत अशा अटीदेखिल काही प्रभारीकडून घातल्या जायच्या. कधी कधीतर त्यांच्या ईतर कामातील व्यस्ततेमुळे भरपूर वेळ पोलिस स्टेशनला त्यांना ताटकळत‌ थांबावे लागायचे.

दक्षिण मुंबई येथील पोलीस‌ आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे संमतीपत्र मिळवण्यासाठी सुद्धा आम्हाला‌ खूप अडचणी आल्या. कारण वरिष्ठ पदावरील प्रत्येक अधिकाऱ्यांना असे संमतीपत्र देणे रिस्की वाटत असावे असे आम्हाला वाटायचे, कारण वरकरणी आमच्या संशोधनाच्या विषयाबाबत त्यांचा अभिप्राय सकारात्मक असायचा, मात्र लिखित संमती‌पत्र‌ देण्यासाठी ते चालढकल‌ करायचे. एका आयुक्तांने तर हा विषय तुम्ही संशोधनासाठी घ्यायला नको होता असे बोलून आमचे मनोधैर्य‌ खचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही न खचून जाता इतरही १० ते १२ एसीपी व डिसीपी दर्जाच्या वरिष्ठांना भेटून व चर्चा करून अपेक्षित सहकार्य मिळवले, त्यांच्यापैकी काही अधिकार्यानी विशेषता महिलांनी तर आम्हाला मनापासून सहकार्य‌ केले. 

त्यामुळेच तब्बल दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण‌ मेहनतीने विविध पदांवर कार्य़रत असलेल्या ५६० महिला व पुरूष पोलीसांची संशोधनासाठी माहीती‌ मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर‌ संपूर्ण माहीती व आकडेवारीचे‌ अभ्यासाच्या नियोजित उद्दिष्टे व गृहितकानुसार संकलन, विश्लेषण व योग्य सांख्यिकी चाचणीचा वापर करुन गृहतीकांची तपासणी केली. यासाठी के. सी. महाविद्यालयाचे‌ सांखिंकी विषयाचे प्रा. डॉ. संतोष मुळे सरांनी आम्हाला खूप सहकार्य केले. 

सोनाली शिराळकरांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई विद्यापिठाच्या संशोधन विभागाला त्यांचा पीएच. डी. प्रबंध सादर केला व त्याचा निकाल कालच्या रक्षाबंधन व पौर्णिमेच्या शुभ दिनी दि. ९/८/२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता ऑनलाईन ओपन डिफेन्स कार्यक्रमद्वारे लागला, यावेळी शिक्षण व पोलिस क्षेत्रातील ३९ व्यक्ती ऑनलाईन उपस्थित होते. शिवाजी विद्यापिठाचे बाह्य परिक्षक, *डॉ. ए. एम. गुरव* यांच्याकडून,  मुंबई विद्यापिठाच्या सहयोगी अधिष्ठाता व अध्यक्षा *डॉ. किशोरी भगत*, सिद्धार्थ‌ महाविद्यालयाचे प्राचार्य‌, *डॉ. यु. एम. मस्के* व उपप्राचार्य *डॉ समीर ठाकूर* यांच्या प्रमुख उपस्थितीत *सोनाली शिराळकर-ताटकर* यांना वाणिज्य व व्यवस्थापन विषयात विद्यावाचस्पती (Ph. D.) पदवी जाहीर करण्यात आली, त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन‌.  

सोनाली म्यॅडमच्या संशोधनाच्या सदर यशस्वी प्रवासात‌ त्यांच्या‌ कुंटुंबियाचा त्यांना मिळालेला भक्कम पाठिंबा व आशिर्वाद त्यांच्यासारख्या सर्वच कर्तृत्ववान व हूशार लेकींना मिळावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

*-डॉ. विष्णू ज. भंडारे*
(संशोधन मार्गदर्शक), 
सिद्धार्थ महाविद्यालय, संशोधन केंद्र, फोर्ट, मुंबई- ०१

4 comments:

  1. Hearty Congratulations, 😀on behalf behalf ,Bharati Vidyapeeth Deemed to be University Pune
    Dean Faculty of Science, Prof. DR.SUNIL GANPATRAO PAWAR (TADASAR)

    ReplyDelete
  2. Hearty Congratulations Dr.Sonali madam and Dr. Vishnu Bhandare. . Dr. B. S. Gaikwad

    ReplyDelete

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...