Monday, 1 September 2025

हर्षवर्धन सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त असोसे वाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप !!

हर्षवर्धन सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त असोसे वाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप !!

मुरबाड (मंगल डोंगरे) : रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने असोसेवाडी येथे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांचा जन्मदिवस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात आदिवासी वस्तीमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जन्मदिनानिमित्ताने उपस्थितांसह केक कापण्यात आले व नंतर खाऊ वाटप केले याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष जयवंत हरड, शिवळे विभाग प्रमुख सचिन धुमाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

प्रांताध्यक्ष श्री.हर्षवर्धन सकपाळ हे प्रयत्नवादी नेतृत्व असुन कर्मवादी विचारसरणीचे त्यांच्या जन्मदिनानिमित्त समाज उपयोगी उपक्रम करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...