Monday, 1 September 2025

कारवाईत कसुर करत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या वावी पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश शिंदे व संबंधित व्यक्तींवर निलंबनाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण !!

कारवाईत कसुर करत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या वावी पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश शिंदे व संबंधित व्यक्तींवर निलंबनाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण !!

नाशिक, प्रतिनिधी - भोकणी ता. सिन्नर, जिल्हा - नाशिक) रहिवासी रमेश मुरलीधर रणशेवरे हे शेतकरी असून यांच्या शेतात काम करीत असताना जुन्या वादातून व गावातील अलका मोकळ, भाऊसाहेब मोकळ, कैलास मोकळ, विनोद रणशेवरे, अरुण रणशेवरे यांच्या चिथावणीमुळे - सोमनाथ रणशेवरे, नंदा रणशेवरे यांनी रमेश मुरलीधर रणशेवरे यांच्या पत्नी शोभा रमेश रणशेवरे व मुलगी सुजाता घेगडमल यांना लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यात शोभा रणशेवरे हाताला दुखापत होऊन रक्त निघाले. या संदर्भात वावी (तालुका सिन्नर) पोलिस स्टेशनला तक्रार करण्यासाठी रमेश रणशेवरे त्यांच्या कुटुंबासह गेले असता तेथील अधिकारी सचिन कक्कड व ठाणे अंमलदार यांनी तक्रार न घेता फिर्यादीस दमदाटी केली.

या अन्यायाविरुद्ध पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी संबंधित पोलिस स्टेशनचे पो. नी. गणेश शिंदे व ठाणे अंमलदार निंबेकर यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई न करता फिर्यादीस वेठीस धरून शोभा रणशेवरे व त्यांची मुलगी सुजाता घेगडमल यांना रात्री १० वाजेपर्यंत बसवून ठेवले.

या सर्व अन्यायाविरुद्धात मी रमेश रणशेवरे यांनी सोमनाथ रणशेवरे, नंदा रणशेवरे तसेच त्यांना चिथवणारे व आम्हाला मानसिक त्रास देणारे अलका मोकळ, भाऊसाहेब मोकळ, कैलास मोकळ, विनोद रणशेवरे, अरुण रणशेवरे व यांना पाठिशी घालणारे एपीआय गणेश शिंदे, पो. अं. निंबेकर, सचिन कक्कड यांच्या वर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कठोर कारवाई करावी व आरोपींवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येणे या साठी मा. मुख्यमंत्री / गृहमंत्री (महाराष्ट्र राज्य) पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण), पोलिस उप अधीक्षक (निफाड, नाशिक), तसेच संबंधित पोलिस स्टेशनला निवेदन दिले असून कारवाई होत नाही तोपर्यंत रमेश रणशेवरे व त्यांचे कुटुंबीय बेमुदत उपोषण करत आहेत. 

सदर अन्याय झालेल्या कुटुंबाला व त्यांच्या उपोषणास पाठिंबा व न्याय हक्क मिळवून देणे करिता अनंत पटेकर (बहुजन क्रांति सेना संस्थापक अध्यक्ष), मा. सूर्यकांत भालेराव :- उपाध्यक्ष बहुजनक्रांतिसेना पक्ष, महा प्रकाश  पवार :- महासचिव बहुजनक्रांतिसेना पक्ष, ज्योती रणशेवरे :- संपर्क प्रमुख महाराष्ट्र प्रदेश), अनिल  बाविस्कर, सुभाष मोरे, सुभाष रणशेवरे व जयश्री रणशेवरे तसेच पत्रकार व सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दर्शविला आहे.


No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...