खोपटे येथे भक्तीमय कवी संमेलन संपन्न !!
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेच्या कवींचे खोपट्याच्या धसाखोशी गावामध्ये केशव पां.म्हात्रे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी होणारे २७ वे कविसंमेलन ०१ सप्टेंबर रोजी आगरीबौलीतील साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.सूत्रसंचालन शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी सुरेखपणे केले.
यावेळी सुमधुर आवाजात अनिल भोईर यांनी अभंग रचना, भरत पाटील यांचे माऊलींचे भारूड, नरेश ग. पाटील यांची दोहे रचना, गजानन म्हात्रे यांची तसेच बालकवी अनुज शिवकर यांची बालगीतांच्या रचना, के.पां.म्हात्रे यांचे भावगीत, अजय शिवकर यांचे खोपट्याच्या तळ्यात सापडलेल्या गणपतीची कथा, म.का.म्हात्रे यांची विनोदी काव्यरचना आणि रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील यांचे आगरी बोलीत पसायदान इत्यादी सादरीकरणात भावपूर्ण भक्तिमय वातावरण झाले.
याप्रसंगी यावर्षी खोपटे गावातून सी.ए.झालेल्या नीतेश लावू म्हात्रे यांचा सत्कार केला. दिलीप पाटील, देविदास म्हात्रे, राजश्री भगत, माजी सरपंच संगीता पाटील, ज्योती म्हात्रे, गौरव अनिल मोकाशी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment