Tuesday, 2 September 2025

" गोष्ट धमाल गावाची " चे प्रकाशन !!

" गोष्ट धमाल गावाची " चे प्रकाशन  !!

उरण दि २,'(विठ्ठल ममताबादे) :
       सुप्रसिद्ध नाटककार किशोर पाटील यांच्या " गोष्ट धमाल गावाची " या नाटकाच्या हस्तलिखित प्रतीचे पूजन रायगड भूषण प्रा.एल बी पाटील यांनी आणि प्रकाशन जीवन गावंड यांच्या शुभहस्ते झाले. तसेच " एकविरा आई " या गाण्याच्या ध्वनिचित्र प्रतीचे प्रकाशन मुकुंद गावंड आणि सरपंच कलावती पाटील यांच्या शुभहस्ते झाले. 

यावेळी आपल्या भाषणात रायगड भूषण प्रा.एल.बी पाटील म्हणाले की किशोर पाटील हे एक रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य नाट्यलेखक आहेत. " हाय रे हाय" , " हा-या मारतोय हेलपाट्या " या नाटकांच्या यशा नंतर हे नाटक मोठे यश मिळवेल. याचवेळी मुकूंद गावंड  म्हणाले की, " नाटक रंगमंचावर आणण्यासाठी धमक असावी लागते, ती धमक शिवशंकर नाट्य मंडळाकडे असून आम्हा मंडळींचे संपूर्ण सहकार्य राहील. हा कार्यक्रम पिरकोन या गावी संपन्न झाला. शेखर पाटील यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन विलास गावंड यांनी केले. यावेळी दिनेश गाताडी, महेंद्र गावंड, धिरेंद्र ठाकूर, जगदीश गावंड, अमृत म्हात्रे, राजेंद्र गावंड, एकनाथ म्हात्रे, छगन गावंड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाच्या सभासदांनी उत्तम नियोजन केले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...