Tuesday, 2 September 2025

राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कार प्रवीणकुमार तोगरे यांना जाहीर !!

राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कार प्रवीणकुमार तोगरे यांना जाहीर !!

उरण दि २,'(विठ्ठल ममताबादे) : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात उरण, जि. रायगड येथील प्रवीणकुमार संग्राम तोगरे यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वा. रोटरी क्लब हॉल, गंजमाळ,शालिमार, नाशिक येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला/पुरुष यांचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये उरणचे प्रवीणकुमार संग्राम तोगरे यांचा समावेश आहे. त्यांना हा पुरस्कार मिळणार असल्यामुळे विविध स्तरावरून प्रवीण तोगरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...