Tuesday, 2 September 2025

विमला तलावात जेष्ठ नागरिकांसाठी पत्र्याचा शेड बांधण्याची मागणी !!

विमला तलावात जेष्ठ नागरिकांसाठी पत्र्याचा शेड बांधण्याची मागणी !!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील विमला लवान गार्डन येथे दररोज सकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत ज्येष्ठ नागरिक योगासने व व्यायाम करण्यासाठी मोठया प्रमाणात येत असतात. उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणताही ऋतू किंवा कोणतेही सण उत्सव असले तरी हे जेष्ठ नागरिक न चूकता दररोज नियमीतपणे योगासने व व्यायाम करण्यासाठी एकत्र येत असतात. गार्डन मधील मधील मोकळ्या जागेत हे जेष्ठ नागरिक योगासने व व्यायाम करीत असतात. उन्हाळ्यात उन असताना तसेच पावसाळ्यात जोरदार पाऊस सुरु असतानाही हे नागरिक त्याच ठिकाणी मोकळ्या जागेत उभे राहून व्यायाम व योगासने करीत असतात. उन्हाळ्यात व पावसाळ्यात या ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे ज्येष्ठ नागरिकांचे उन पाउस या पासून संरक्षण व्हावे. या दृष्टीने उरण विमला तलाव गार्डन मध्ये ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी व्यायाम व योगासने करतात त्या ठीकाणी पत्र्याचे मजबूत शेड बांधावे जेणेकरून जेष्ठ नागरिकांना उन्हाळ्यात उन्हापासून सावली मिळेल व पावसाळ्यात पावसापासून संरक्षण मिळेल अशी मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे. उरण नगर परिषद प्रशासनाने जेष्ठ नागरिकांच्या मागणीचा विचार करून पत्र्याचे मजबूत शेड बांधावे. अशी मागणी उरणमधील जेष्ठ नागरिक यांच्यासह गार्डन मध्ये व्यायामासाठी येणारे युवा वर्ग, इतर नागरिकांनीही केली आहे. याबाबतीत उरण नगर परिषद लवकरच सकारात्मक प्रतिसाद देईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोट (चौकट ):- 

पत्र्याचे शेड बांधण्यासाठी सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल. सर्व निकष तपासून शासनाच्या नियमात जे बसते ते केले जाईल.
  - समीर जाधव, मुख्याधिकारी,उरण नगर परिषद, 


जेष्ठ नागरिकांसाठी उरण नगर परिषदेने मजबूत बांधकामचे पत्र्याचे शेड विमला तलाव गार्डन मध्ये बांधून दिल्यास त्याचा फायदा जेष्ठ नागरिक, आबाल वृद्ध, विद्यार्थी, महिला, दिव्यांग बांधव या सर्वांना होणार आहे. जेष्ठ नागरिकांना दरवर्षी पावसात भिजत योगासने व व्यायाम करावा लागत आहे. उन्हाळ्यात कडक उन असतो. भर उन्हात गरम चटके सहन करत जेष्ठ नागरिकांना योगासन व व्यायाम करावे लागतात. जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन उरण नगर परिषदेने जेष्ठ नागरिकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. 
   - साहेबराव ओहोळ, माजी प्राचार्य फुंडे कॉलेज, तथा जेष्ठ नागरिक, उरण

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...