उरणच्या ऍड. प्रियांका पाटील यांनी साकारला न्यू जर्सी अमेरिका येथे अस्सल पुणेरी वाडा !!
** उरणच्या ऍड. प्रियांका पाटील यांची गणेशोत्सवाच्या माध्यमातून अमेरिकेत जनजागृती.
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
भेंडखळ, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील ऍड. प्रियांका धनंजय पाटील हिने अमेरिका येथील न्यू जर्सी येथे राहून आपली भारतीय संस्कृतीची जोपासना करून पर्यावरणपुरक पुणेरी वाड्याची आरास केली आहे.
सदर पुणेरी वाड्याचे नाव 'चार्मोली वाडा' असे देण्यात आले असून सदर नाव हे चार जिवलग मित्रपरिवार पासून प्रेरित होऊन नाव दिले आहे. सदर पुणेरी वाड्याची सजावट जवळ जवळ दोन महिने चार मित्र व त्यांचे परिवार यांच्या श्रमांचे फळ आहे.
सदर सजावट महाराष्ट्र राज्यातील रीती व परंपरा दर्शवणारे असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घेऊन जाणारे आहे. सदर सजावट ही फक्त सजावट नसून कित्येक वर्षांचे नाते, प्रेम व देवापोटी समर्पण दाखविणारा पुणेरी वाडा आहे. सदर वाडयाचे हृदयापाशी श्री गणपती विराजमान झालेले आहेत. त्याभोवती स्वयंपाक घर असून त्यामध्ये पारंपरिक पद्धतीचे पितळाची भांडी आहेत. तसेच त्यामध्ये पारंपरिक पोशाखा मध्ये राहणारे लोक आहेत. लहान मुले संगीत वाद्य वाजवत आहेत व खेळत आहेत.त्यामध्ये तुलसी वृंदावन असून रांगोळी देखील काढली आहे. तसेच पुणेरी पाटी लावली आहे जे सांगते कि बेल वाजविल्यावर थोडी वाट पहायला शिका, घरात माणसे राहतात स्पायडरमॅन नाही. चपला आणि शहाणपण दोन्ही बाहेर सोडावे. अश्या रितीने भारतातील नागरिक जरी अमेरिका मध्ये कामानिमित्त गेले असले तरी पारंपरिक सण आजची पिढी विसरलेली नाही हे दाखविणारे हे गणपती सजावट आहे. भारतीय असलेल्या ऍड. प्रियांका पाटील यांनी अमेरिका सारख्या प्रगत देशात गणेशोत्सव साजरा करून आपली भारतीय संस्कृती आचार विचार परंपरा जपली आहे. त्यामुळे ऍड. प्रियांका पाटील यांच्या कलाकृतीचे, कला कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment