Wednesday, 17 September 2025

मिलिंद नगर येथे गरजू महिलांना साडी वाटप !!

मिलिंद नगर येथे गरजू महिलांना साडी वाटप !!

कल्याण -मिलिंद नगर येथील धर्मवीर आनंद दिघे शाळेमध्ये गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, श्री लक्ष्मी फाउंडेशन अध्यक्षा व माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर यांच्या उपस्थित, स्पेक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. 

यावेळी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती, महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण याविषयी जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमला स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, महाराष्ट्र उद्योजक परिवार चे प्रमुख मंगेश शेळके, दिलीप सिंग, सीमा सिंग पोर्णीमा मोरे, लक्ष्मण शिंपी, रंजना माने, वासंती जाधव, पल्लवी पुजारी, अवनी केने, चित्रा मोरे या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...