Wednesday, 24 September 2025

संगीता गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती !!

संगीता गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : उरण-द्रोणागिरी नोड येथे
भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार सोहळाही भव्य उत्साहात संपन्न झाला. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे हा सोहळा जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला. या वेळी भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष संगीता रवींद्र गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. 

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद रवी भोईर, युवा नेते प्रतिम म्हात्रे, उरण शहर ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडल अध्यक्ष धनेश गावंड, महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, द्रोणागिरी नोड भाजपा अध्यक्ष शेखर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व नगरसेविका, माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे विचार व कार्य तळागाळात पोहोचावे, पक्षाच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त न्याय देता यावा या अनुषंगाने तसेच संगीता रवींद्र गायकवाड या भारतीय जनता पार्टीच्या कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्या असल्याने त्यांची निवड भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी करण्यात आली आहे. संगीता गायकवाड यांची निवड उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी झाल्याने त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्वांचे आभार मानत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल मी पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानते. पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्याकरिता माझ्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात मी सर्वांना सोबत घेवून पक्ष संघटन अधिक मजबूत करून विविध निवडणूकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देईन त्यासाठी मी नेहमी सक्रिय राहीन.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी, मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष  अविनाश कोळी, महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपाचे ध्येय, धोरणे व कार्यक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करेन, पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवेन असे मत या प्रसंगी नवनियुक्त भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस संगीता गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...