नालासोपाऱ्यात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट...
**शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांची घटनास्थळी भेट
नालासोपारा, प्रतिनिधी, ता, २३ :- नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा( ट्रान्सफॉर्मर) स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत दोघे जण होरपळून गंभीर जखमी झाले आहेत.
याच भागात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने रोहित्र बसविले आहे. सोमवारी रात्री अचानकपणे या रोहित्राचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली आहे. या आगीत एक तरुण व चार वर्षीय मुलगी दोघे ही होरपळून गंभीर जखमी झाले आहेत.
जावेद अन्सारी ( ३०) व नसरीन परवीन (४) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांना स्थानिकांनी सोपारा येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र मोठ्या प्रमाणात आगीत ७० ते ८० टक्के होरपळून गेल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी घटनास्थळी भेट देत नालासोपारा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी साहेब यांच्या कडुन माहिती घेत स्थानिक नागरीकांशी संवाद साधला यावेळी जखमींना मोफत रूग्णवाहिकेची मदत व उपचारासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे रूचिता नाईक यांनी सांगितले.
ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पालघर, यांच्याशी माझं बोलणं झालं असून ते आवश्यक ती सर्व मदत करणार आहेत.
No comments:
Post a Comment