जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्याकडून बैठक !!
वाडा, प्रतिनिधी : येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्याकडून जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. वाडा तालुक्यातील आबिटघर जिल्हा परिषद गट गटाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. खैरे येथे झालेल्या या बैठकीसाठी राष्ट्रवादी महिला पालघर जिल्हाध्यक्ष रोहिणीताई शेलार, जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाटील, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, विधानसभा अध्यक्ष नाना साबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी माजी उपसभापती जगदीश पाटील, तालुका सरचिटणीस महेश भोईर, उपाध्यक्ष संगीत मेणे, जिल्हा महिला उपाध्यक्षा चित्राताई पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार वेखंडे, महिला तालुका अध्यक्षा जान्हवी ताई पाटील, युवक तालुका अध्यक्ष नितीन देसले, कृषी आघाडी तालुका अध्यक्ष सुधीर विशे, विभाग अध्यक्ष संदीप देशमुख, कौशिक पाटील, पवन पाटील, स्थानिक सरपंच, उपसरपंच तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------- प्रतिक्रिया ------
*राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे महायुती किंवा स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील.
- जयेश शेलार
अध्यक्ष : राष्ट्रवादी वाडा तालुका
No comments:
Post a Comment