Thursday, 18 September 2025

ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत श्री.विवेक गायकवाड विजयी !

ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत श्री.विवेक गायकवाड विजयी ! 

मुंबई (पी.डी. पाटील): विक्रोळी कन्नमवार नगर येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळ (रजि.) या संस्थेची सन २०२५ ते २०२८ करीता त्रैवार्षिक निवडणुकीत विजयी उमेदवारांची पदनिहाय निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत श्री. विवेक गायकवाड यांना ६ मते मिळाली. श्री. निवृत्ती मस्के यांना ४ मते मिळाली तर श्री. सुरेश सरनोबत यांना फक्त १ मत मिळाले.
      निवडणूक अधिकारी श्री. दिपक देशनेहरे आणि विनोद वणीकर यांनी पुढीलप्रमाणे नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्ष श्री. विवेक विठोबा गायकवाड, उपाध्यक्ष श्री.निवृत्ती शिदू मस्के,सचिव ज्येष्ठ पत्रकार श्री नासिकेत कृष्णकांत पानसरे, उपसचिव श्री.श्रद्धानंद रावबा निकम ,खजिनदार  श्री .गौतम निवृत्ती डांगळे,कार्यकारिणी सदस्य
श्री .सुरेश भिकाजी सरनोबत, भुमय्या रामलू सोमा, राजाराम शंकर क्षीरसागर, बबन बापू माने, दत्तात्रय रामचंद्र धनवडे, सुनिल नारायण गायकवाड.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...