Friday, 19 September 2025

स्फूर्ती फाउंडेशन प्रयत्नातून योगीधाम परिसरात पथदिवे !!

स्फूर्ती फाउंडेशन प्रयत्नातून योगीधाम परिसरात पथदिवे !!

(नवरात्रोत्सवापूर्वी नागरीकांची मागणी पूर्ण)

कल्याण, प्रतिनिधी - योगीधाम परिसरातील शिवमंदिर जवळील, शिव अमृतधाम सोसायटी समोरील रस्त्यावर महिला, नागरिकांना केलेल्या मागणीनुसार या रस्त्यावर रात्री अपरात्री प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटते यासाठी अधिक विद्युत दिवे लावण्याची मागणी स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांच्याकडे करण्यात आली होती, नागरिकांच्या सुरक्षिततेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित केडिएमसी विभागाकडे पत्रव्यवहार करीत, या रस्त्यावर पथदिवे लावण्यासाठी मागणी करत ती मंजूर करून तत्काळ पथदिवे बसवण्यात आले. 

परिसरातील जेष्ठ, महिला व नागरिकांनी तत्काळ दखल घेतल्याबद्दल स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांचे आभार मानले, दरवर्षी या परिसरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो त्या पूर्वी पथदिवे लावण्यात आले त्या निमित्त नागरीकांनी आनंद व्यक्त केला, यासाठी बजरंग तांगडकर यांनी केडीएमसी विदुत विभाग कर्मचारी व अधिकारी यांना धन्यवाद दिले. विद्युत पथदिवे यांची पाहणी करण्यासाठी गेले असता स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, दिलीप सिंग, सिमा सिंग, पिंकी गुप्ता, लक्ष्मण शिंपी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...