Saturday, 20 September 2025

शिवसेना (उबाठा) ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा शाखा क्रमांक १२४ तर्फे प्रतिनिधी यांची नियुक्ती !

शिवसेना (उबाठा) ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा शाखा क्रमांक १२४ तर्फे प्रतिनिधी यांची नियुक्ती !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             शिवसेना (उबाठा) ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा शाखा क्रमांक १२४ शिवसेना नेते , खासदार, ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री. अनिल भाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ईशान्य मुंबई विभाग प्रमुख श्री.सुरेशजी पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  घाटकोपर पश्चिम विधानसभा कक्ष संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर  यांच्या सहकार्याने तसेच कक्ष उपसंघटक १२३/१२४ राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक १२४ निर्मला आवटे यांच्या प्रयत्नाने शाखा क्र. १२४ येथे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली. विठ्ठल सोलंकर, अजय शेलार, मनिषा अडलीकर, मालती भारमळ, जयश्री कांबळे, अक्षदा हत्ते, चंद्रभागा मिसाळ, मनिषा हुळावले यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा प्रमुख संतोष सवने, स्थानिक लोक अधिकारी समिती निरीक्षक सोपान जाधव, यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी कक्ष प्रसारक अनंत पवार ,कक्ष वार्ड संघटक १२३ संतोष चांदे, संघटक बाबा पांचाळ, समन्वयक शिवाजी शेवाळे, कार्यालय प्रमुख सुनिल राऊत, उपशाखाप्रमुख सतिश खाडविलकर, महादेव बंडगर, सागर फुलसुंदर, इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने कक्ष वार्ड संघटक १२४ निर्मला आवटे, विठ्ठल सोलंकर ,अजय शेलार, मनिषा अडलीकर, मालती भारमळ, जयश्री कांबळे, अक्षदा हत्ते, चंद्रभागा मिसाळ ,मनिषा हुळावले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच अनेकांनी विभागात अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...