बोईसर येथे नागरी संरक्षण दलामार्फत श्रीगणेश विसर्जनासाठी प्रथमोपचार सेवा !!
बोईसर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन गृह विभाग (विशेष) अंतर्गत कार्यरत नागरी संरक्षण दलामार्फत बोईसरमधील बेटेगाव तलाव परिसरात श्रीगणेश व गौरी विसर्जन निमित्त प्रथमोपचार केंद्राचे आयोजन करण्यात आले. विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भक्तगण गर्दी करत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली.
जिल्हा उपनियंत्रक श्री. कुरकुटे यांच्या आदेशानुसार व विभागीय क्षेत्ररक्षक नरेश म्हस्के, दुर्घटना नियंत्रण अधिकारी अजित राऊत, वहन व नियंत्रण अधिकारी अनंत पिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र यशस्वीपणे पार पडले. यामध्ये सुषमा जाधव, संदीप देवरे, डॉ. दिपेश पष्टे, वैशाली राऊत, राज दवणे, सचिन भोणे, ईशांत जाधव, ममता देशमुख, प्रथमेश पाटील, स्मिता माळवदे तसेच नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांनी कार्यभार सांभाळला.
या केंद्राचे पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, ग्रामपंचायत तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी विशेष कौतुक केले. गणेश भक्तांनीही अशा सामाजिक सेवेसाठी नागरी संरक्षण दलाचे मन:पूर्वक आभार मानले.
नागरी संरक्षण दल हे राज्यभरात विविध ठिकाणी आपत्कालीन सेवा व सामाजिक उपक्रम राबवित असून, गणेशोत्सव काळात त्यांनी दाखवलेले योगदान स्तुत्य ठरले आहे.
No comments:
Post a Comment