वाचन चळवळीतून भोसले पाटील कुटुंबाचा ११ वर्ष गणेश उत्सवाचे !!
गेली ११ वर्ष सातत्य ठेवत भोसले कुटुंबीय गणेश उत्सव साजरा करीत आहे. उत्सव साजरा करीत असताना आपल्या कामातून देखील अनेक उपक्रमाची माहिती लोकांना मिळत असते व त्यातून प्रभावी होऊन सहभाग घेत असतात.
गेली ११ वर्ष भोसले कुटुंबा तर्फे गणेश उत्सव साजरा करताना रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, संविधान जागर, संविधान प्रास्ताविकेचे वाटप, देशप्रेम पत्र, वकृत्व स्पर्धा तसेच एक वही, एक पेन उपक्रम तसेच या उपक्रमात जमा झालेले सर्व साहित्य हे ठाणे शहरातील वस्तीमध्ये शिकणाऱ्या मुलांना देण्यात येतात जे विद्यार्थी स्वतः मिळेल ते काम करून हलाकीच्या परिस्थिती आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्यां विद्यार्थ्यांना साहित्य दिले जाते. हे विद्यार्थी नाका कामगारांची मुलं, सफाई कामगारांची मुले तसेच कचरा वेचणाऱ्या पालकांची मुल जे आपले शिक्षणपूर्ण करण्यासाठी धावपळ करीत आहे. त्यांना हे साहित्य देण्यात येते. तसेच अनेक गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना आवाहन करून हे साहित्य जमा केले जाते ज्यात नारळ आणि हारा सोबत एक पेन एक वही घेऊन या असे केले जाते. ११ वर्षात विविध उपक्रम केले जातात त्यात भारताच्या संविधान प्रस्ताविकेच्या प्रतचे वाटप, तसेच वृक्ष वाटप, देशप्रेमी विषयी संदेश देणारे पत्र, संत परंपरेचे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज असे अन्य संताचे संदेश देणारे पोस्टर व संविधानात उल्लेख असणारे संदेश यांचे पोस्टर लावून प्रदर्शन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काव्याचे पुस्तक, काझीचं वाडग मनोहर अहिरे, आणि शिवाजी कोण ? कॉ. गोविंद पानसरे, काव्यफुले, भारतीय राष्ट्रनिर्मितीची मूलतत्वे डॉ बाबासाहेब आंबेडकर, धुनी प्रदूषणाची, सडक नाटक अविनाश कदम, अंधार अंधश्रध्देच्या, यशवंत व्हा, शोध कूटस्थाच्या, माझधार अनुराधा पोतदार, सोन्याच्या धुराचे ठसके मीना वैद्य, रोग मनाचा शोध मनाचा सफाई कामगारांच्या व्यथा जगदीश खैरालिया, छत्रपती शिवाजी महाराज, एस. एम. जोशी, पृथ्वीवर येऊ घातलेले संकट, हि पुस्तके देण्यात आली आहे. यंदा ११ व्या वर्षी वाचन चळवळ चालू रहावी म्हणून आपण अनेक नावाजलेल्या लेखकांची पुस्तके देऊन त्यांना वाचनास प्रवृत्त करण्यास सांगत आहोत. अनेक जन मोबाईलचा अती वापर, ग्रंथालयात न जाणे, वाचन न करणे तसेच कामाच्या व्यापातून वेळ न मिळणे अशा अनेक अडचणी असताना त्यांनी पुन्हा वाचनाकडे वळावे म्हणून वाचन करीत रहावे म्हणून यंदा प्रसिद्ध वाचनाची १०० हून अधिक जास्त पुस्तके दर्शनास येणाऱ्या भाविक भक्तांना देण्यात आले.
कार्यक्रमाला मराठा बाटालियांचे आर्मी ऑफिसर फौजी संदीप साळुंखे, श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया, संघटक व समता विचार प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल दिवेकर, सदस्य किशन सिंग बेदी, निलेश दंत, दर्शन पडवळ, इनॉक कोलियार, अनिश्का बर्डे, टिशा दाठिया, जया इंगळे, सृष्टी दळवी, मयुरी चिरमुले, निर्जला कोटा, सुजाता शिंदे, अनमोल साळवी, आधार फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ श्याम पांड्ये, महासचिव मुबारक शेख, सदस्य मंगेश पाटोळे, भाजपा कळवा मंडळ अध्यक्ष तेजस चंद्रमोरे, सदस्य अरविंद रणशिंगे, अष्टविनायक मित्र मंडळाचे सदस्य महेंद्र कोडक, अमित मंडलिक, प्रशांत मांजरेकर, खजिनदार मंगेश गुप्ता, राहुल गुप्ता, राष्ट्रीय मल्लखांब जिल्हाअध्यक्ष राष्ट्रीय पुरस्कार विजेता किशोर म्हात्रे, उपराष्ट्रपती पदासाठी ज्यांनी अर्ज केला असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. राम मूर्ती आणि मिसेस मूर्ती, लेखक, कवी विनोद पितळे, ॲड वृषाली काकडे, ॲड साहिल गायकवाड, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान चे अध्यक्ष रुपेश शिंदे, खजिनदार मंगेश निकम, समीर डिके, NSS चे आजी, माजी स्वयंसेवक चेतन मोरे, ईशा, रेश्मा, क्रीडा प्रशिक्षक रवी इसाक, दिनेश कोकणे , आर्यन जैस्वाल, विनीत निगम, सल्लागार सुनिल गंद्रे, पोलिस प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल पाटील, संदीप उब्रजकर, मित्र संतोष गोलार, प्रगती कारंडे, योगेश मोरे, IT चे गिरीष चिखलेकर, श्री बालाजी प्रॉडक्शनचे संस्थापक हर्षल, सुषमा उत्तम थोरात, फोटोग्राफर, निरंजन, छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, सूत्रसंचालक, लेखक, कवी प्रकाश बोर्डे असे अन्य सहकारी गणेश दर्शनास उपस्थित होते.
No comments:
Post a Comment