Thursday, 4 September 2025

प्रदीप वाघ यांनी घेतली तहसीलदार गावीत यांची भेट : महत्वाच्या विषय चर्चा !!

प्रदीप वाघ यांनी घेतली तहसीलदार गावीत यांची भेट : महत्वाच्या विषय चर्चा !!

जव्हार-जितेंद्र मोरघा

मोखाडा तालुक्यातील काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन माजी सभापती प्रदीप वाघ यांनी मोखाडा तहसीलदार गमन गावीत यांची तहसील कार्यालयात भेट घेतली व समस्या मांडल्या या मध्ये खोडाळा, मोखाडा येथे आधार कार्ड केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, बँक खातेदारांना अनेक गैरसोय होत असल्याने तालुक्यातील बँकांच्या अधिकार्यांची बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

भात शेती वर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्या बाबतीत कृषी विभाग व महसूल विभागाने पहाणी करावी.
तालुक्यातील ज्या गावांमध्ये रस्ते नाहीत अशा ठिकाणच्या अडचणी समजून मार्ग काढावा इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार भला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...