डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने रास रंग – २०२५ शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन !!
डोंबिवली, प्रतिनिधी : २०१७ पासून दरवर्षी डोंबिवली (पूर्व), डीएनसी रोड येथील डीएनसी शाळेच्या मैदानावर "रास रंग शारदीय नवरात्र उत्सव" भव्यदिव्य पद्धतीने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. या उत्सवामध्ये दरवर्षी विविध मान्यवर नेतेमंडळी, दिग्गज कलाकार, दांडिया प्रेमी व हजारो दुर्गाभक्त उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवतात. यावर्षीचा रास रंग – २०२५ शारदीय नवरात्र उत्सव दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत डीएनसी शाळेच्या मैदानावर थाटामाटात आयोजित करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी, रास रंग नवरात्र उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ डीएनसी शाळेच्या मैदानावर संपन्न झाला. या भूमिपूजन समारंभाचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय श्री गोपाळ लांडगे साहेब, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय श्री राजेश मोरे साहेब, महिला जिल्हा संघटक सन्माननीय सौ. लताताई पाटील, युवा सेना जिल्हा अध्यक्ष सन्माननीय श्री जितेन पाटील साहेब, श्री नवदुर्गा युवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री. सोमिल खिमसरीया व सेक्रेटरी श्री हिमांशू शहा यांच्या शुभहस्ते, श्री गणेशाला श्रीफळ वाढवून, आनंदी व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
यावर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये देखील देशातील सुप्रसिद्ध नैतिक नागडा यांच्या ऑर्केस्ट्राच्या तालावर दांडिया आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी दांडिया प्रेमी व दुर्गाभक्त नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री गोपाळ लांडगे साहेब यांनी केले आहे.
या शुभप्रसंगी उपजिल्हाप्रमुख श्री राजेश कदम साहेब, उपजिल्हाप्रमुख श्री रवी पाटील, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे निकटवर्तीय श्री अभिजीत दरेकर साहेब, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पाटील, उपजिल्हा संघटक श्री विश्वनाथ दुबे साहेब, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावंड चौधरी, उपतालुकाप्रमुख श्री उमेश पाटील, उपतालुकाप्रमुख श्री रवी म्हात्रे, उपकार्यालय प्रमुख श्री सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक श्री राजन दत्ताजी मराठे, माजी नगरसेवक श्री कैलास शिंदे, महिला आघाडी डोंबिवली पश्चिम संघटक केतकीताई पोवार, महिला आघाडीच्या स्वातीताई पोलाडिया, ललिता मेहेर, राजवंती धामण, मीनाताई पवार, लीलावती जयस्वाल, विधानसभा समन्वयक श्री ओम लोके, युवा सेना कल्याण ग्रामीण विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री सुरज राजन मराठे, उपशहर प्रमुख श्री सुनील भोसले, उपशहर प्रमुख श्री संजीव ताम्हणे, उपशहर प्रमुख श्री गजानन व्यापारी, कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक व सचिव श्री बंडूशेठ पाटील, उपशहर संघटक श्री तुषार शिंदे, उपतालुकाप्रमुख श्री राहुल गणपुले, युवा सेना डोंबिवली शहर अध्यक्ष श्री सागर जेधे, कल्याण ग्रामीणचे उपकार्यालय प्रमुख श्री धर्मराज शिंदे, शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेचे सहकार्यालय प्रमुख श्री बालन मोरे, शाखाप्रमुख श्री मिलींद केळुस्कर, शाखाप्रमुख श्री रोहन मोरे, शाखाप्रमुख श्री धनाजी चौधरी, शाखाप्रमुख श्री धनंजय म्हात्रे, उद्योजक महेंद्र गांधी, श्रीकांतजी कोडते, यशवंत शेठ म्हात्रे, श्री उमेश शेठ शेलार, श्री सुधीर पाटील, आमदार श्री राजेश मोरे साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री सतिश मोडक, खासदार कार्यालयाचे श्री प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांचे मान्यवर महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment