राजेंद्रकुमार भास्कर डेरे (वय-६१वर्ष) यांचे शनिवारी देहावसान !!
मुंबई (मोहन कदम) :
त्वष्टा कासार ज्ञाती बांधव महाकाली मंडळ पेण माजी उपाध्यक्ष तथा आजीवन सदस्य राजेंद्रकुमार भास्कर डेरे (वय-६१वर्ष) यांचे देहावसान झाले.ते पेण कासार आळी येथे रहात होते. त्यांचा जन्म २० मार्च १९६५ रोजी झाला होता. त्यांचे निधन शनिवार दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी झाले.
राजेंद्रकुमार हे विभागात सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित होते. त्वष्टा कासार समाजासाठी खूप मोलाचे आणि मोठे योगदान त्यांनी दिले.ते वेळ काळ न बघता प्रत्येक व्यक्तीसाठी सदैव मदतीस तत्पर असत. कायमस्वरूपी सर्वाना मदत करणारे, प्रसंगाला धावून जाणारे व विनोदी स्वभावाचे, मनमिळावू होते. कायमस्वरूपी हसतमुख चेहरा असणारे राजेंद्रकुमार यांचे अनंत चतुर्दशी या दिवशी देहवासन झाले. त्यांच्या प्रेमा पोटी अंत्यविधीला प्रचंड जनसागर हजर होता. त्यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत दुःखवटा व्यक्त केला.
No comments:
Post a Comment