ग्राम विकास मंडल देसाई गाव यांच्या वतीने शिवसेना उपविभागप्रमुख दिपेश भरत पाटील निर्भीड योद्या पुरस्काराने सन्मानित !!
ठाणे, प्रतिनिधी : ऐतिहासिक शिवमंदिर असलेले ठाणे महानगरपालिकेतील खिडकाळी गाव हे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांना नवी मुंबई, पनवेल, मुंब्रा, ठाणे, मुंबई जोडणाऱ्या रस्त्यावर असून आता मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे अनेक महत्त्वाचे व्यवसायिक व रहिवासी प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत. अत्यंत गजबजलेल्या या गावातील स्थानिक रहिवासी असलेल्या गावकऱ्यांच्या तीनशे (३००) एकर जमीनीवर शैक्षणिक (एज्युकेशन) सेंटर चे आरक्षण पडले होते. स्थानिक रहिवासी यांना या आपल्या गावातील जमिनीवरील आरक्षण रद्द व्हावे असे वाटत होते.
शिवसेना उपविभाग प्रमुख श्री दिपेश भरत पाटील यांनी खिडकाळी गावातील तीनशे (३००) एकर जागेवर असलेले शैक्षणिक (एजुकेशन) सेंटर चे आरक्षण मधे बदल करून रहिवासी झोन करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सोबत चर्चा करून प्रमुख भूमिका निभवल्या बदल ग्राम विकास मंडल देसाई गाव यांच्या वतीने 'निर्भीड योद्या पुरस्कारा'ने सन्मानित केले, त्यावेळी अध्यक्ष श्री भगवान पाटील तसेच त्यांचे सहकारी सदस्य यशवंत पाटील, नवनाथ पाटील, राम म्हात्रे, सुभाष देवकर, आर्यन पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment