Friday, 19 September 2025

“बाल दिशा ” राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शना साठी नेहरू आर्ट गॅलरी तर्फे उरण मधील तीन विद्यार्थ्यांची निवड !!

“बाल दिशा ” राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शना साठी नेहरू आर्ट गॅलरी तर्फे उरण मधील तीन विद्यार्थ्यांची निवड !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : दिनांक ११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नेहरू आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे होणाऱ्या “बाल दिशा” नावाच्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून २५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्या २५ विद्यार्थ्यांमध्ये आर्ट क्रियेशन फाईन आर्ट अकॅडेमी मध्ये शिकत असलेले उरण तालुक्यातील कवीश पाटील, मयांक म्हात्रे, ⁠सौमित्र सोमई या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी निवड झाली आहें. नेहरू आर्ट गॅलरी मधील मोठया एसी गॅलरी मध्ये या तिघांचेही चित्रे प्रदर्शित होणार आहेत.उरण मधील प्रसिद्ध चित्रकार रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिन्ही विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत.उरण तालुक्यात कार्यरत असलेल्या आर्ट क्रियेशन फाईन आर्ट अकॅडमी साठी तसेच उरण वासियांसाठी ही अभिमानाची खूप मोठी गोष्ट असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहें. सदर तीन विद्यार्थी व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे आई वडिल, शिक्षक चित्रकार रुपेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, विद्यार्थ्यांसोबत कलेलाही उचित मान सन्मान मिळावा या दृष्टीकोणातून आंतरराष्ट्रीय चित्रकार रुपेश पाटील यांनी उरण मध्ये आर्ट क्रियेशन फाईन आर्ट अकॅडमीची स्थापना केली. महाराष्ट्रील ही पहिली अकॅडेमी असेल कि ज्या अकॅडेमी मध्ये २०० च्या वर विद्यार्थी कलेचे शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत अनेक नामवंत प्रसिद्ध असे मोठे चित्रकार, आर्ट कॉलेजचे प्राध्यापक आणि परदेशातील चित्रकारांनी सुद्धा या अकॅडेमीला भेट दिली आहे. उरण तालुक्यात १ वर्षांपूर्वी आर्ट क्रियेशन फाईन आर्ट अकॅडमीची स्थापना झाली असून एका वर्षातच या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...