पत्रकार उत्कर्ष समितीचे उरण तालुक्यात नव्या कार्यालयाचे उदघाटन !!
उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील पत्रकार उत्कर्ष समितीच्या कार्यालयाचे उदघाटन समारंभ ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.पत्रकार उत्कर्ष समिती ही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कार्यरत असून पत्रकारांचे हक्क व न्याय तसेच सामाजिक भान ठेवून सामाजिक हितासाठी लढणारी नोंदणीकृत संस्था असून अनेक सामाजिक व आरोग्यदायी योजनांचे सफल आयोजन करणारी ही संस्था आहे.या संस्थेच्या उद्घाटनाच्या वेळी जेष्ठ पत्रकार प्रदीप पाटील आपल्या भाषणात म्हणाले की पत्रकार उत्कर्ष समितीचे उरण तालुका अध्यक्ष पूजा चव्हाण यांना अध्यक्ष पद मिळाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती व चांगली कामे तीच्या हातून घडत राहावेत.या उद्घाटनाच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष पत्रकार पूजा चव्हाण, पत्रकार तृप्ती भोईर, पत्रकार रणीता पाटील, पत्रकार सायली साळुंखे, पत्रकार विठ्ठल ममताबादे पत्रकार ज्योती म्हात्रे, जय शिवराय यु ट्यूब चैनल चे उपसंपादक संयोग चव्हाण यावेळी उपस्थित होते.पत्रकार उत्कर्ष समितीच्या माध्यमातून पत्रकारांना विविध माध्यमातून न्याय दिला जात असून अनेक पत्रकार या संघटनेत सामील होत आहेत. आता उरणच्या पत्रकारांना एक चांगली संघटना व हक्काचे कार्यालय मिळाल्याने पत्रकारांनी आनंद, समाधान व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment