Wednesday, 1 October 2025

नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ बोरी, उरण येथे विविध उपक्रम उत्साहात संपन्न..

नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ बोरी, उरण येथे विविध उपक्रम उत्साहात संपन्न..

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ बोरी,उरण यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरा करत विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. यंदाचे मंडळाचे नवरात्रौत्सवचे  हे ५१ वे वर्षे आहे. घट स्थापना, लहान मुले व पुरुष यांचे मनोरंजन कार्यक्रम, हरीपाठ, हळदीकुंकू, खेळ पैठणीचा सन्मान गृहलक्ष्मीचा, आरोग्य शिबीर, शिल्पकला, फाइनआर्ट, वर्कशोप, पाक कला स्पर्धा, नवदुर्गा पुरस्कार पारितोषिक वितरण समारंभ, होम हवन, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक बाल्या नृत्य, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान, वेशभूषा गरबा, महाजागरण, नवदुर्गा मातेची भाव मिरवणूक आदी कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. मंडळाचे अध्यक्ष अतुल ठाकूर, उपाध्यक्ष विशाल चौलकर, स्वागताध्यक्ष जयवंत सतेरे, कार्याध्यक्ष सुदेश साळुंखे, सचिव दिपेश म्हात्रे, खजिनदार हेमंत अधिकारी, सह सचिव दिलीप साळुंखे, सह सचिव वसंत कुलये, सह खजिनदार कुणाल पवार,सह खजिनदार रवींद्र म्हात्रे व सर्व कार्यकारिणी सदस्य, निमंत्रक,प्रमुख सल्लागार सर्व सभासद, देणगीदार,वर्गणीदार व हितचिंतक आदींचे सहकार्य नवरात्रौत्सव मधील विविध उपक्रमाला लाभले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...