Wednesday, 1 October 2025

चेंबूर पूर्व येथे भारत नगरमध्ये पहाटे रस्त्यात झाड कोसळले नोकरदारांचा खोळंबा !!

चेंबूर पूर्व  येथे भारत नगरमध्ये पहाटे रस्त्यात झाड कोसळले नोकरदारांचा खोळंबा !!

मुंबई - निलेश कोकमकर 

चुंबूर वाशी नाका परिसरात दसऱ्याच्या दिवशी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर आणि घरावर पिंपळाचे भले मोठ झाड कोसळले . मुख्य रस्त्यातच झाड कोसळल्यानं आणि गाड्या घेऊन जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने रुग्णालयात जाणाऱ्या व्यक्तींची आणि सकाळी नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या लोकांची मोठी पंचायत झाली. स्थानिकांच्या माहितीनुसार हेच झाड तिसऱ्यांदा कोसळले असल्याचे समजले. ह्या आधी वेळीच झाडाच्या फांद्या छाटल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती.

सदर घटनेत कोणतीही मानवी दुखापत किंवा नुकसान झाले नसले तरी ऐन पावसाच्या दिवसात घराचे मोठ नुकसान झाले आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशामक दल आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांच्या मदतीने रस्त्यातून झाड हटवण्याचे काम करण्यात आले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...