Tuesday, 14 October 2025

माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक १५९ मधील ५ हजार नागरिकांना मोफत दीपावली कीटचे वाटप !!

माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक १५९ मधील ५ हजार नागरिकांना मोफत दीपावली कीटचे वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
चांदिवली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे तालुका संयोजक माजी नगरसेवक प्रकाश देवजी मोरे आणि जिल्हा उपाध्यक्षा उषा प्रकाश मोरे यांच्या वतीने दीपावली निमित्ताने रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी साकीनाका मोहिली व्हिलेज, झुंजार मैदान येथे ५ हजार नागरिकांना दीपावली भेट वस्तू वाटप करण्यात आले. दिवाळीचा आनंद वाढवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १५९ मधील नागरिकांसाठी मोफत दीपावली कीटचे (Diwali Kit) रवा, मैदा, साखर, उटणे, पणती आणि कॅरी बॅगचे वाटप कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी साकीनाका प्रभाग क्रमांक १५९ येथील ५ हजार नागरिकांनी दीपावली वाटप करिता नोंदणी करण्यात आली होती. माजी नगरसेवक प्रकाश मोरे आणि जिल्हा उपाध्यक्षा उषा मोरे यांनी आयोजित केलेल्या या मोफत दीपावली भेट वस्तू वाटप कार्यक्रमाचा विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंत, माजी नगरसेवक सिताराम तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रांशु दीक्षित यांच्यासह विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...