चांदिवलीतील शिवस्मारक मुंबईतील सर्वात प्रेरणादायी वास्तू ठरेल - मंत्री आशिष शेलार
** संघर्षनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचे भव्य भूमिपूजन
मुंबई(शांताराम गुडेकर) :
चांदिवलीतील संघर्षनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचे भव्य भूमिपूजन नुकतेच पार पडले. या स्मारकाच्या माध्यमातून स्थानिकांना आपल्या गौरवशाली इतिहास आणि समृद्ध संस्कृतीशी जोडणारी प्रेरणा मिळेल, अशी भावना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली. “हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, भारतमाता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींनी सजलेला हा चौक मुंबईतील सर्वात प्रेरणादायी स्थळांपैकी एक ठरेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चांदिवलीतील संघर्षनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. शिवस्मारक समिती, चांदिवली यांच्या मार्फत आयोजित या कार्यक्रमाला आमदार संजय उपाध्याय, आमदार दिलीप लांडे, शिवसेना विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मोरे, शुभ्रांशु दीक्षित, माजी नगरसेवक सीताराम तिवारी, भाजपाचे पवई मंडळ अध्यक्ष महेश चौगुले आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य रेश्मा चौगुले आदिसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते. या दरम्यान आपल्या भाषणात पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले, “दिवाळीच्या पवित्र सणात शिवस्मारक समितीच्या माध्यमातून पुण्याचे कार्य घडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण होत असून, या चौकात शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, भारतमाता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती असतील. हे ठिकाण मुंबईतील सर्वात प्रेरणादायी स्थळांपैकी एक बनेल.” यावेळी शिवस्मारक समितीचे महेश चौगुले आणि रेश्मा चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.
No comments:
Post a Comment