चाईल्ड केअर तर्फे बालसंस्कार केंद्र मध्ये अन्नदान !!
उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे सावित्रीबाई फुले झोपडपट्टी उरण येथे अन्नदान व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.हा उपक्रम संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नरेश म्हात्रे (रायगड भूषण), ऍडवोकेट विजेंद्र पाटील (कायदेशीर सल्लगार), पत्रकार विठ्ठल ममताबादे (चाईल्ड केअर सामाजिक संस्था मीडिया सल्लागार) उपस्थित होते. तर संस्थेतर्फे विकास कडू (संस्थापक, अध्यक्ष), मनोज ठाकूर (कार्याध्यक्ष), विक्रांत कडू (कार्याध्यक्ष), कु अभिषेक माळी (सदस्य), कु विवेक कडू (सदस्य) तसेच बालसंस्कार केंद्र मधील सेविका भारती पाटील, किरण घरत, प्रियांका घरत व सावित्रीबाई बाई फुले झोपडपट्टी मधील शेकडो महिला व बाल संस्कार केंद्र मधील ५० लहान मुले या कार्यक्रमांस उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी सांस्कृतिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकार किरण घरत (भेंडखळ) यांचा चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेश म्हात्रे यांनी संस्थेचे तोंड भरून कौतुक केले व त्यांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.आणी ज्यांचा सम्मान करण्यात आला ते किरण घरत यांनी संस्थेचे आभार मानताना म्हणाले की - "ही पहिलीच संस्था मी बघतो की आमच्या सारख्या छोटया कलाकारांचा विशेष सन्मान दर वर्षी करत असते.यामुळे आमच्या सारख्या कलाकारांचे मनोबल खूप वाढते आणी नवीन ताकत येते त्या बद्दल संस्थेचे खूप आभार"
या अन्नदान निमित्य आज शेकडो मुले व सावित्रीबाई फुले झोपडपट्टी मधील महिलांनी अन्नदानाचा लाभ घेतला.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू म्हणाले की - "ही संस्था ९ वर्षांपूर्वी याच ठिकाणी स्थापना झाली.आज छोटेसे रोपटे चांगल्या प्रकारे वाढत आहे. यांचे सर्व श्रेय माझ्या सहकाऱ्यांना देईन. त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून या संस्थेचे नाव आज रायगड जिल्ह्यात मोठे केले. या संस्थेला मोठे करण्या मागे जितका माझा हात असेल तितकंच दुसरा हात संस्थेचे मीडिया सल्लागार पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचा आहे. हे मी व चाईल्ड केअर सामाजिक संस्था कधीही विसरणार नाही तसेच या संस्थेचे सल्लागार मिलिंद खारपाटील यांचेही वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन नेहमी लाभते त्या बद्दल मी त्यांचेही खूप आभारी आहे"
सदर अन्नदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व बालसंस्कार केंद्र मधील सेविकाने विशेष मेहनत घेतली.एकंदरीत कार्यक्रम मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात पार पडला.कार्यक्रमाची प्रस्तावना विकास कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रांत कडू यांनी केले.
No comments:
Post a Comment