भेंडखळ ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची पायाभरणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न !!
उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर भेंडखळ ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे नविन बांधकाम करण्याकरिता भेंडखळ गावच्या प्रथम नागरिक सरपंच मंजिता मिलिंद पाटील, उपसरपंच अजित वासुदेव ठाकुर, ग्रामपंचायत सदस्य दिपक दामोदर ठाकूर, लिलेश्वर गजानन भगत, ग्रामपंचायत सदस्या- संगिता मेघश्याम भगत, सोनाली कौस्तुभ ठाकूर, शितल जिवन ठाकूर, स्वाती संतोष पाटील, स्वाती महेंद्र घरत, अक्षता अनिल ठाकूर, ग्रामपंचायत अधिकारी किरण वसंत केणी, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची पायाभरणी करण्यात आली.
No comments:
Post a Comment