Friday, 3 October 2025

डॉक्टर दिपक आलम यांना आयुष महासन्मान पुरस्कार २०२५ प्रदान !!

डॉक्टर दिपक आलम यांना आयुष महासन्मान पुरस्कार २०२५ प्रदान  !!

**मुरबाडच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुरबाड {मंगल डोंगरे} : मुरबाड तालुक्यातील
शिरवली  गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर दिपक शंकर आलम यांना नुकताच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केन्द्र- राजकोट टीडीसी (पीपीडीसी) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार ची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय प्रतिष्ठेचा असा मानाचा आयुष महासन्मान पुरस्कार २०२५ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तारांकित हॉटेल नवी मुंबई येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आयुर्वेद, योग नेचरोपैथी, होमियोपैथी, युनानी, सिद्ध, एक्युपंचर, एक्युप्रेशर अशा विविध आयुष क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चिकित्सकांना व थेरपिष्ट यांना देण्यात आला.

या पुरस्काराला भारतातील शेकडो आयुष चिकित्सक व थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या लोकप्रिय आमदार श्वेता महाले सोबत डॉ मंगला कोहली सल्लागार युनायटेड नेशन चाईल्ड वुमेन व पूर्व सहायक महानिदेशक, स्वास्थ सेवा निदेशालय, स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार डॉ. प्रवीण जोशी राष्ट्रीय सलाहकार आईमा एव पूर्व उप निदेशक टिडीसी आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्थान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी श्री गणेश एम साहायक संचालक विस्तार केन्द्र राजकोट व उदयपूर एमएसएमई टीडीसी (पीपीडिसी) आग्रा एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्थान व प्रशिक्षण अधिकारी राजकोट एमएसएमई श्री प्रणव पंडया उपस्थित होते.
  
 
 तसेच यावेळी डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे व्हाईस चेअरम,
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे 
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे  पदाधिकारी* डॉ. दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, डॉ रवी शिंदे,डॉ रचित म्हात्रे, डॉ जनार्धन यादव,
डॉ विनोद ढोबळे, डॉ राकेश झोपे, डॉ श्री भूषण नागरे, डॉ विजय नवल पाटील, डॉ फुके डॉ रामेश्वर शिंदे,योगाचार्य भानुदास परबत, डॉ रावसाहेब घोडेराव, डॉ धिरज मेश्राम, प्रवक्ते श्री तुषार वाघूळदे ,आयुष  इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. दिपक शंकर आलम यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून डॉ.दिपक शंकर आलम यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

मोहने येथील पाटील बाल मंदिर शाळेचा दहावीचा विद्यार्थी वेदांत मिश्रा बेपत्ता !!

मोहने येथील पाटील बाल मंदिर शाळेचा दहावीचा विद्यार्थी वेदांत मिश्रा बेपत्ता !! पालकांची आर्त हाक कल्याण, संदीप शेंडगे : मोहने पर...