Friday, 3 October 2025

ठुणे गावात ब्रह्मलीन योगी रूपनाथजी बाबा यांचा ४० वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न.!. निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न..!!

ठुणे गावात ब्रह्मलीन योगी रूपनाथजी बाबा यांचा ४० वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न.!. निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न..!! 

**कर्तव्यदक्ष पत्रकार  बाळासाहेब भालेराव यांना  पुरस्काराने सन्मानित

मुरबाड, {मंगल डोंगरे} : मुरबाड तालुक्यातील ठुणे गावात काल ब्रह्मलीन योगी रूपनाथजी गुरु रिद्धीनाथजी यांचा ४० वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या शिवराज बंगला या निवासस्थानी यानिमित्ताने इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीनही गटांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धकांचा यावेळी सप्रेम भेट आणि शिवप्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी माझे बाबा, छत्रपती श्री शिवाजी महाराजआज असते तर... हे दोन विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण कृष्णकांत मलिक, गायकर सर यांनी केले. तर संयोजन रघुनाथ पष्टे यांनी केले. दुपारच्या सत्रात हरिभक्ती पारायण रेखाताई कंटे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. टाळकरी, गायक कलावंत यांनी कीर्तन सेवेला सुंदर साथ दिली. या सोहळ्यामध्ये अनेक व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले .यावेळी पखवाज वादक अरुण महाराज घावट, सत्संग परिवार मधुकर मलिक महाराज, कीर्तनकार रेखा कंटे, निवेदक भरत दळवी, पत्रकार बाळासाहेब भालेराव या काही व्यक्तींना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामस्थ मंडळ ठुणे आणि जय भवानी नगर ठुणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. दरवर्षी या  कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे यावेळी  ज्ञानेश्वर मुरबाड यांनी सांगितले. यावेळी बाजार समिती संचालक शहापूर सुनील धानके,   कर्तव्यदक्ष म्हणून पत्रकार बाळासाहेब भालेराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, सुरेश व्यापारी, उमवणे बाबा, दिनकर मोहपे गुरुजी, जयवंत मुरबाडे, विघ्नेश भोईर, खंडू मुरबाडे (अण्णा) आणि अन्य उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचलन भरत दळवी यांनी केले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...