मुरबाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा संपन्न !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) : महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनताभिमुख करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला.त्यात दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 संपन्न झाला आहे. सदर सेवा पंधरवड्यामध्ये राबविण्यात येणारे लोकोपयोगी उपक्रम तीन टप्प्यात घेण्यात आले.
**टप्पा क्रमांक पहिला दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025__
मुरबाड तालुक्यातील पानंद रस्ते, शिवरस्ते वहिवाटीचे रस्ते, ग्रामीण रस्ते यांचे सर्वेक्षण करून मोजणी व सीमांकन करण्यात आले. सदर रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन अभिलेखात नोंद घेणे व दुतर्फा वृक्ष लागवड करणे हे ह्या टप्प्यात करण्यात आले. सहा महसुली गावांचे नकाशे तयार करून माननीय आमदार किसनजी कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
**टप्पा क्रमांक दोन दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 25* अन्वये सर्वांसाठी घरे हा उपक्रम पंचायत समिती मुरबाड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता
**टप्पा क्रमांक तीन दिनांक 28 ते 2 ऑक्टोबर 2025* मध्ये नाविन्यपूर्ण योजना अन्वये विविध प्रकारचे एकूण 1544 दाखले वाटप करण्यात आले.
**लक्ष्मी मुक्ती* योजनेअंतर्गत 52 खातेदार यांच्या सातबारा सदरी मूळ शेतकऱ्यांसोबत त्याच्या पत्नीचे नाव दाखल करण्यात आले.
तालुक्यातील आदिवासी व इतर लोकांचे 83 जन्ममृत्यू आदेश देण्यात आले. यावेळी मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या सह नायब तहसीलदार सुषमा बांगर मॅडम,श्री. शिंदे शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी, वनखाते, अशा विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना मध्ये नव्याने 133 लाभार्थी यांचे कागदपत्र तयार करून पेन्शन मंजूर दाखले देण्यात आले. फॉरेस्ट विभागामार्फत कुकर व बांबू रोपांचा वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment