Friday, 3 October 2025

मुरबाड रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रमोद हिंदुराव यांना दिल्लीला सोबत नेऊन रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - अजितदादा पवार.

मुरबाड रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रमोद हिंदुराव यांना दिल्लीला सोबत नेऊन रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - अजितदादा पवार.

मुरबाड, {मंगल डोंगरे} : गेले अनेक वर्षे  रखडलेला मुरबाड  माळशेज रेल्वे चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच स्थानिक नेते प्रमोद हिंदुराव यांना दिल्लीला सोबत नेऊन रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार- असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुरबाड मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी दिले. त्याप्रसंगी माजी खासदार  आंनद परांजपे, आमदार दरोडा, राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे. प्रतिक हिंदुराव, भरत गोंधळी, चंद्रकांत बोस्टे, यांचेसह अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. 
        आगामी स्वराज संस्थांच्या  निवडणुका लक्षात घेता प्रमोद हिंदुराव यांनी आपल्या चिरंजीवाचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुरबाड मध्ये ताकद  वाढविण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते मुरबाड मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले व त्यानंतर माऊली गार्डन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्चे बांधणीला सुरुवात केली. 
        यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुरबाड मधिल समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी प्रतिक हिंदुराव यांनी मुरबाड मधिल बंद पडलेल्या औद्योगिक कारखान्यामुळे सुशिक्षित तरुणांपुढे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. तसेच उच्च शिक्षित तरुणांसाठी मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज व नाट्यगृह उभारण्यात यावे अशी मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सध्या तालुक्यात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन विविध योजना राबविते त्यातुन मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज उभारले जाईल परंतु त्यांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तालुक्यातील बंद असलेले कारखाने पुर्ववत सुरू करण्यासाठी उद्योग मंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल.
        पुढे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की ठेकेदारी तुन कामे करा. परंतु त्याचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे. स्वतःचे फायद्यासाठी ठेकेदारी करु नका, असा सल्ला दिला तर लाडक्या बहिणना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले , मुरबाड मधील जनसंपर्क कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकाला योग्य मार्गदर्शन करा अन्यथा त्याचे परिणाम मत पेटीत पाहायला मिळेल असे ही त्यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन दिवाळी पुर्वी मदत जाहीर करू असे जाहीर केले. मात्र अजित पवार शेतकऱ्यांसाठी काही खास घोषणा करतील असे वाटत होते परंतु देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मुंबई मध्ये येत आहेत त्यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी जाहीर करत शेतकऱ्यांचा प्रश्न अधांतरी ठेवला.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...