श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभाग तर्फे उरण मध्ये श्री दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न !!
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी तसेच समाजात श्रीशिवछत्रपती धर्मवीर श्रीशंभुछत्रपती या पिता-पुत्रांच्या विचारांचा हिंदू समाज व्हावा असा आशिर्वाद श्री तुळजा भवानीच्या चरणी मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गावो-गावी पहाटे ०६:०० वाजता श्री दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते. हया वर्षी उरण शहरात तीन दिवस श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या श्री दुर्गा दौड मध्ये भाविक भक्त, शिवप्रेमी, विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी मोठया संख्येने सामील झाले होते.विजया दशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी या श्री दुर्गामाता दौड ची सांगता होते. नवीन संकल्प घेवून देव देश धर्माच्या रक्षणासाठी माता-माऊलींच्या संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहू अशी आई तुळजा भवानी चरणी शपथ घेतली जाते.या राष्ट्र कार्यासाठी आम्हाला शिवछत्रपती धर्मवीर शंभूछत्रपती यांच्यासारखी शक्ती दे, बळ दे, शौर्य दे, धैर्य दे, धाडस दे असा आशिर्वाद आई तुळजा भवानी चरणी मागितला जातो. दसऱ्याच्या दिवशीच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा असलेला वार्षिक उपक्रम म्हणजे धारातीर्थ गडकोट मोहीम.या मोहिमेची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी करतात. यावर्षीची धारातीर्थ गडकोट मोहीम ही श्री लोहगड ते श्री भिमगड मार्गे राजमाची अशी असणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो धारकरी या गडकोट मोहिमेत सहभागी होत असतात आणि आपल्या मावळ्यांनी त्यावेळी जगलेलं आयुष्य अनुभवत असतात. सर्वांना आवाहन असेल की आपण या धारातीर्थ गडकोट मोहिमेत सहभागी होऊन आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी जे जीवन जगलं आहे ते गडावर कसे राहिले असतील त्यांनी कशा मोहिमा केल्या असतील ते कुठ झोपले असतील त्यांनी कोणत पाणी पिल असेल याची अनुभूती घेण्यासाठी एकदा नक्की या गडकोट मोहिमेत सहभागी व्हा असे आवाहन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभाग तर्फे करण्यात आले आहे .
No comments:
Post a Comment