Saturday, 4 October 2025

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप - श्री.गोपाल भानुशाली (सामाजिक कार्यकर्ता)

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप - श्री.गोपाल भानुशाली (सामाजिक कार्यकर्ता)
 
३१ महिला वेटर एका पत्र्याच्या खोलीत बंद ; कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांनाही नाही !

जागरूक नागरिक गोपाल भानुशाली यांनी ठाणे व नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल केली तक्रार

ठाणे, विशाल कुरकुटे ;

ठाणे/नवी मुंबई दि.– ४ ऑक्टोबर २०२५ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपाल भानुशाली यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे  कार्यालयात दाखल केलेल्या लेखी तक्रारीत, भरारी पथकाचे निरीक्षक एम.पी. धनशेट्टी आणि विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी एका बारवर रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन (नवी मुंबई) यांच्या हद्दीत हॉटेल माया (मायरा)  कारवाई करताना लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

*माया(मायरा) बारवर कारवाई – पण कुठलाही गुन्हा रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन यामध्ये नोंदवला गेला नाही हे बाब अती गंभीर आहे*

तक्रारीनुसार, २९ मार्च २०२४ रोजी, नवी मुंबईतील टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, रबाळे एमआयडीसी येथील ‘मे. माया बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट’ येथे मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क ठाणे शहर यांचे भरारी पथक ने ही कारवाई करण्यात केली. कारवाईचे नेतृत्व निरीक्षक धनशेट्टी यांनी केले होते, तर विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशावरून ही मोहीम राबविण्यात आली होती.

या कारवाईदरम्यान, रात्री २.३० ते ३.३० वाजेदरम्यान, हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने बंद दरवाजा एका पत्र्यावरून आत उतरून उघडला. अधिकारी बारमध्ये प्रवेश करून तपासणी करत असताना, परवाना कक्षाच्या मागील बाजूस पत्र्याची एक बंद खोली दिसून आली. या खोलीत तब्बल ३१ महिला वेटर बंदिस्त अवस्थेत आढळल्या.

बंद खोलीत महिलांची कोंडी – पोलिसांकडे कुठलीही नोंद नाही !

विशेष बाब म्हणजे, एवढ्या गंभीर प्रकरणात स्थानिक पोलीस किंवा महिला पोलिसांना पाचारण केले गेले नाही. एवढेच नव्हे, तर सामाजिक कार्यकर्ते गोपाल भानुशाली यांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातून माहिती अधिकार कायद्यान्वये मिळवलेल्या माहितीवरून असे निष्पन्न झाले आहे की, सदर घटनेबाबत कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेला नाही.

जर त्या पत्र्याच्या खोलीत कोणत्याही महिलेला शारीरिक, मानसिक त्रास झाला असता किंवा जीवितहानी झाली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची? हा गंभीर प्रश्न भानुशाली यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केला आहे.

‘व्यक्तिगत फायद्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार’ – आरोपांची मालिका

भानुशाली यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क यांनी फक्त स्वतःचे नियमानुसार कारवाई केली. पण जे अतिशय गंभीर बाब होती त्या कारवाईसाठी त्यांनी टाळाटाळ केली आहे असा स्पष्ट दिसत आहे 👉महिलांची सुटका केली गेली, पण गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, स्थानिक पोलीस स्थानकात माहिती दिली गेली नाही, किंवा हॉटेल मालकावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. असं का??

या सगळ्याचा अर्थ असा लावला जात आहे की, सदर प्रकरण दाबण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले असावेत. निरीक्षक धनशेट्टी व त्यांच्या स्टाफने लाखो रुपयांची लाच स्वीकारली असावी, असा ठपका लावण्यात आला आहे. यामध्ये विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांची संमती व सहभाग असल्याचे देखील भानुशाली यांनी नमूद केले आहे.

तक्रार व मागणी : दोषींवर कारवाई करा _

श्री. गोपाल भानुशाली यांनी सादर केलेल्या लेखी तक्रारीसह सर्व संबंधित पुरावे, माहिती अधिकारातून मिळवलेली माहिती, महिलांच्या सुटकेबाबतची माहिती यांचा संपूर्ण दस्तऐवज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे व नवी मुंबई कार्यालयात सादर केला आहे. त्यांनी याप्रकरणी संबंधित अधिकारी वर कारवाई चे मागणी केली आहे  :

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
हॉटेल मालक आणि व्यवस्थापकावरही कठोर कारवाई करण्यात यावी.
या प्रकरणाची माहिती ई-मेल _ [policeprabhav@gmail.com] आणि व्हॉट्सअ‍ॅप [7039030905] वर पाठवावी.
पत्राच्या अखेरीस स्पष्ट जबाब : ‘मी कोणत्याही दबावाशिवाय तक्रार केली आहे’ पत्राच्या अखेरीस श्री. गोपाल भानुशाली यांनी स्पष्ट केले आहे की, “मी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध जे आरोप केले आहेत, ते माझ्या वैयक्तिक निरीक्षणावर आधारित आहेत. माझ्याकडे याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. ही तक्रार मी कोणत्याही दबावात न येता, नशा किंवा प्रभावाखाली न राहता, पूर्ण शुद्धीने आणि जबाबदारीने केली आहे.”

कोणालाही अधिक माहिती पाहिजे असेल तर गोपाल भानुशाली यांनी स्वतःचे नंबर सुद्धा प्रसारित केले आहे 
गोपाल भानुषाली 
7039030905

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...