Saturday, 4 October 2025

कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने पुरोहित (पुजारी) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !!

कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने पुरोहित (पुजारी) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !!

आपण प्रत्येक कार्याची सुरुवात पूजाअर्चा, विधी करून करीत असतो. मात्र आजच्या काळात नामकरण विधी, भूमिपूजन, गृहप्रवेश, विवाह, साखरपुडा, दशक्रिया, उत्तरकार्य यांसह अन्य कार्यातील पूजा विधींसाठी आपल्याला पुरोहित (पुजारी) सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे आपले कार्य पुरोहिताशिवाय पार पाडावे लागते. 

आपल्या कार्यासाठी प्रशिक्षित पुरोहित मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा यांच्याकडून  पुरोहित प्रशिक्षण निवासी शिबिर (दि.24 ते 30 ऑक्टोबर 2025) दरम्यान तानसा ग्लोबल स्कूल, मेट, ता. वाडा, जि. पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. 

या शिबिरासाठी ज्योतिषाचार्य डॉ. रज्जन प्रसाद पटैल एम.ए. (ज्योतिर्विज्ञान), पीएच.डी. (वैदिक वास्तु विज्ञान), दमोह (मध्यप्रदेश) तसेच कुर्मी डॉ.हेमंत कौशिक, पीएचडी (पंचकर्म व वैदिक तज्ञ) बनारस (उत्तरप्रदेश) हे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहे. तरी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी संजय पाटील (मो. 9637774771) जयेश शेलार (7620256750) तुकाराम पष्टे (9272686882) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महासभेच्यावतीने करण्यात आले आहे.

माहिती / प्रसिद्धी - जयेश शेलार पाटील (वाडा, पालघर)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...