Sunday, 26 October 2025

कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने आयोजित पुरोहित (पुजारी) प्रशिक्षण शिबिराचे भव्य उद्घाटन समारोह संपन्न !!

कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने आयोजित पुरोहित (पुजारी) प्रशिक्षण शिबिराचे भव्य उद्घाटन समारोह संपन्न !!

* प्रशिक्षण वर्गात 60 प्रशिक्षणार्थींचा सहभाग

हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी व प्रत्येक विधीसाठी पुरोहितांची आवश्यकता असते मात्र सध्या समाजात पुरोहितांची संख्या कमी झाल्याने त्याची उणीव भासू लागली आहे. अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्यावतीने  कुणबी समाजातील समाज बांधवांसाठी ७ दिवसीय निवासी पुरोहित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाडा तालुक्यातील मेट येथील तानसा ग्लोबल स्कुल येथे होत असलेली या शिबिराचा उद्घाटन समारोह शुक्रवार (ता २४) रोजी पार पडला. यावेळी कुर्मी महासभेचे अध्यक्ष संजय हांडोरे पाटील व तानसा ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष मंगेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उद्योजक गजानन जाधव, उपजिल्हा धिकारी बी.बी.ठाकरे, महासभेचे सचिव जयेश शेलार, कोकण विभागाचे अध्यक्ष तुकाराम पष्टे, मुंबईचे डॉ. बाबुलालसिंह, ॲड. गोपाळ शेळके, सुबोध भाई, चिंचघरचे उपसरपंच मनेश पाटील, डाकिवलीच्या उपसरपंच श्रावणी पाटील, मुंबई म्युनिसिपल बँक संचालक भानुदास भोईर, वाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, समीर पाटील, किसन बोंद्रे, नरेश आकरे, रोहिदास पाटील,सुभाष पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते. 

या पुरोहितांना अयोध्येहून आलेले प्रसिद्ध व जेष्ठ पुरोहित डॉ रजनकुमार पटेल व ज्येष्ठ पुरोहित विजय दळवी हे सात दिवस प्रशिक्षण देणार आहेत विशेष म्हणजे या प्रशिक्षणात दक्षिण आफ्रिकेत स्थायिक असलेले ज्ञानेश्वर शेलार हे सहभागी झाले आहेत. वेळी बोलताना महासभेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की या प्रशिक्षणातून समाजातील कर्मकांड व अंधश्रद्धा दूर होऊन कुणबी समाजातील पुरोहितांचे समाजात आदराचे स्थान निर्माण होईल व व त्यामुळे एक चांगला नवीन समाज निर्माण होईल तसेच पुरोहित झाल्यावर आपल्या आचरणात व विचारात बदल करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित पुरोहित प्रशिक्षणार्थींना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेल शैलीत मनेश पाटील यांनी केले तर आभार जयेश शेलार यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होते. 

" या प्रशिक्षणातून शिक्षण घेऊन आम्हाला धार्मिक विधी विधी करताना ब्राह्मणांची उणीव भासणार नाही समाजात एक नवी चळवळ या निमित्ताने उभी राहील"
      जयंत पाटील,
      प्रशिक्षणार्थी,
 
" या प्रशिक्षणातून मला आपल्या देशातील भारतीय संस्कृती जपण्यासाठी विदेशात उपयोग होणार आहे,या आधी आम्हाला भारतातून ऑनलाइन पुरोहित मागवावे लागत होते आता मी स्वतः प्रशिक्षण पूर्ण करून धार्मिक विधी करणार आहे"
     ज्ञानेश्वर शेलार, रहिवासी 
     दक्षिण आफ्रिका,

प्रसिद्धीसाठी - महासभेचे सचिव जयेश शेलार (जेष्ठ पत्रकार)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...