“स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल ओमकार धुळप सन्मानित !!
प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा – निलेश खरे
मुंबई (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा “स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे “प्राईड ऑफ स्पंदन” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.“प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार सर्वांसाठी ऊर्जा देणारा आहे,” असे गौरवोद्गार साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे यांनी काढले. ते कराड येथील वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर महंत आहिल्यागिरीजी महाराज, प्रेरणादायी वक्ते डा. विनोद बाबर, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, टीव्ही 9 मराठीच्या पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेत्री प्राजक्ता नवनाळे, सिनेअभिनेते योगेश पोवार, ॲड. धम्मराज साळवे, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका सायली धनाबाई, केतकी प्रकाशनचे चंद्रकांत जाधव, तसेच ट्रस्टचे संस्थापक डा. संदीप डाकवे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात “महाराष्ट्रातील माणिकमोती” या पुस्तकाचे प्रकाशन व स्व. राजाराम डाकवे (तात्या) वाचनालयाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. या बोधचिन्हाचे रचना सुप्रसिद्ध कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे.
निलेश खरे म्हणाले, “डॉ.संदीप डाकवे हे बहुप्रतिभावान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून समाजासाठी वेगळी वाट तयार केली आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.”
डॉ.विनोद बाबर यांच्या प्रेरणादायी भाषणाने सभागृहात चैतन्य निर्माण झाले, तर गायक विजय सरतापे यांच्या सुरेल गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना “प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२५” ने सन्मानित करण्यात आले.त्यात विशेष म्हणजे उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल “ओमकार भीमराव धुळप” यांना “प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड २०२५” ने गौरविण्यात आले.त्यांना हा पुरस्कार साम टीव्हीचे संपादक निलेश खरे, टीव्ही 9 च्या निवेदिका सेजल पूरवार, आणि महंत महायोगी अहिल्यादेवी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यांच्या गणेशोत्सव विशेष वार्तांकनाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
स्पंदन जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. यंदाच्या पूरस्थितीमुळे त्या रकमेचा वापर पूरग्रस्तांसाठी करण्यात आल्याची घोषणा डा. संदीप डाकवे यांनी केली — ज्यातून संस्थेचा संवेदनशीलपणा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डा. संदीप डाकवे, सूत्रसंचालन सौ. अंजली गोडसे, तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
दीपप्रज्वलन आणि कु. माधुरी करपे हिच्या भरतनाट्यममधील गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, सत्यवान मंडलिक, समाधान पाटील, जालिंदर येळवे (फौजी), चंद्रकांत चव्हाण, यशराज चव्हाण, गुलाब जाधव (फौजी), भिमराव धुळप, ओमकार धुळप, रेश्मा डाकवे, पुनम जाधव, शीतल दवणे, गौरी डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment