Wednesday, 22 October 2025

पडघ्यातील सर्पमित्रांकडून अजगराला जीवनदान !!

पडघ्यातील सर्पमित्रांकडून अजगराला जीवनदान !!

भिवंडी, प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) : 

भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात सर्पमित्रांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि दक्षतेने ७ फूट लांबीच्या व अंदाजे १५ किलो वजनाच्या अजगराला सुरक्षित जीवनदान दिले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. पडघा येथील एका किराणा दुकानाच्या मालकास दुकानात अचानक भला मोठा सर्प दिसल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ सर्पमित्र सूरज गायसमुद्रे आणि रवी दांडगे यांना याची माहिती देण्यात आली.

सर्पमित्रांनी घटनास्थळी दाखल होत सावधगिरी बाळगत निरीक्षण केले असता, तो सर्प अजगर प्रजातीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी कोणतीही हानी न पोहोचवता अत्यंत काळजीपूर्वक त्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. आपल्या भक्ष्याच्या शोधात तो दुकानात शिरल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. यानंतर सर्पमित्र सूरज गायसमुद्रे व रवी दांडगे यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्या अजगराला पडघा परिसरातील सुरक्षित जंगलात सुखरूप सोडून दिले. या कामात पडघा वन परिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. बिनविषारी अजगर साप सुरक्षित पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात परत पाठवल्याने गावकऱ्यांमध्ये दिलासा पसरला असून सर्पमित्रांच्या या संवेदनशील आणि पर्यावरणपूरक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा कृतीमुळे वन्यजीव संवर्धनाचा उत्कृष्ट आदर्श साकारला गेल्याचे पर्यावरणप्रेमींकडूनही मत व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...