दिवाळी फराळाचा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लुटला आनंद !!
** मोठया उत्साहात साजरी झाली दिवाळी.
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :उरण विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वतीने अनेक विविध उपक्रम राबविले जातात. शिवसेना (शिंदे गट) चे उरण विधानसभेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिवाळी गोड व्हावी, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होता यावे, दिवाळी सणाचा सर्वांना एकत्रितपणे लुटता यावा या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी कामठा रोड उरण शहर येथील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दिवाळी फराळ च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात उरण विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळचा आनंद लुटला.यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदर दिवाळी फराळ कार्यक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर, उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, उरण विधानसभा सचिव हितेश नाईक, उप तालुका प्रमुख अमित ठाकूर, पनवेल उप तालुका प्रमुख गौरव गायकवाड,उरण शहर प्रमुख सुलेमान शेख, वाहतूक सेनेचे पदाधिकारी दशरथ चव्हाण, करंजाडे शहर संघटक -स्वप्नील मोरे, वडघर शहर प्रमुख समाधान परदेशी, वडघर विभाग प्रमुख रवि पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी वडघर विभाग, वडघर शहर, चिरनेर विभागातील अनेक वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी विविध कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदावर नियुक्ती करण्यात आली. अधिकृतपणे नियुक्तीचे पत्रही यावेळी देण्यात आले.एकंदरीत शिवसेना तर्फे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रम पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment