Tuesday, 21 October 2025

पडघ्यात मातीच्या किल्ल्यांची परंपरा कायम - तरुणाईने उभारले ऐतिहासिक किल्ले !!

पडघ्यात मातीच्या किल्ल्यांची परंपरा कायम - तरुणाईने उभारले ऐतिहासिक किल्ले !!

** पन्हाळगड ते सिंधुदुर्गपर्यंत किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी दिवाळीचा उत्सव उजळला

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) : 

दिवाळीच्या सणात पारंपरिक मातीचे किल्ले बांधण्याची परंपरा आजही पडघा परिसरात जोमात दिसून येते. ऐतिहासिक वारसा जपण्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण ठेवण्याच्या उद्देशाने पडघ्यातील तरुणाई आणि बालमंडळींनी यंदाही विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.
ब्राह्मण आळीतील मिहिर राऊत आणि निल राऊत यांनी ‘पन्हाळगड’ किल्ल्याची प्रतिकृती तयार केली असून, ध्रुवांग थोरे, दीप कांबळे, अर्पित पाठक, आयुष लोंढे, मित थोरे, जतीन लोंढे आणि संकेत राठोड यांनी ‘मुरुड-जंजिरा’ किल्ला उभारला आहे. सोनारआळीत रोहित कांबळे, गायत्री महाजन,चैतन्या महाजन, सही कांबळे,प्रिया कांबळे, तनिष्का जोशी लाभश्री जोशी, सार्थक हाडपे  शौर्य हाडपे , प्रियांश्री पातकर यांनी ‘मल्हारगड (सोनेरी किल्ला)’ साकारला. शास्त्रीनगरातील स्वराज दळवी  यश दळवी यांनी ‘सिंधुदुर्ग’ किल्ला उभारला, तर रोहिदास नगरातील वेदांत भोईरने ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची प्रतिकृती साकारली. याच भागातील श्लोक जाधव, मंथन जाधव  राज जाधव, कौस्तुभ जाधव, यज्ञेश जाधव, यश जाधव यांनी ‘राजगड’ किल्ला उभारला आहे. बालाजी नगरातील वेणुबाई मित्र मंडळाच्या वतीने अनुष्का दिनकर, गणेश मूडे, सोहम आणि सक्षम कदम, लाभेश कदम, पियुष आणि दिव्या जाधव, वेद पितांबरे, पराग तावडे, निधी दिनकर आणि संग्राम पाटील यांनी ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली. या किल्ल्यांच्या माध्यमातून तरुणाईने इतिहासाचा अभिमान जागवण्याबरोबरच देशभक्तीची भावना वृद्धिंगत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर मावळ्यांच्या मूर्तींसह सजवलेले हे किल्ले दिवाळीच्या सणाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक तेज देत आहेत.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...