Thursday, 9 October 2025

रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठका व जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात संपन्न !!

रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठका व जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात संपन्न !!

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) :
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या. रोहा, तळा, महाड आणि माणगाव या तालुक्यांतील बैठकीत स्थानिक स्तरावरील पक्ष कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठका यशस्वीपणे पार पडण्यासाठी रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील देशमुख, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले, माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे आणि महाड तालुका अध्यक्ष उमेश तांबे यांनी आपल्या तालुक्यांमध्ये बैठकीचे अत्यंत प्रभावी नियोजन केले.या दौऱ्यादरम्यान तळा, माणगाव आणि महाड येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विशेषतः तळा तालुक्यात या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक नव्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून, त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत अल्पसंख्याक विभाग रायगड अध्यक्ष अखलाख शिलोत्री, रायगड काँग्रेस उपाध्यक्ष किरीट पाटील, पनवेल ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठका आणि उद्घाटन कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला असून, आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...