श्रीकांत शिंदे फाउंडेशन व एसजी एज्युकेशन च्या माद्यमातून इयत्ता 10 वी च्या 2000 हजार विध्यर्थ्यांना मार्गदर्शन !!
कल्याण, प्रतिनिधी :
कल्याण, शिवसेना कल्याण शहर शाखा (पश्चिम) आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व एसजी एज्युकेशन च्या सहकार्याने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले गणित-विज्ञान विषयावरील कल्याणमधील सर्वात मोठे मार्गदर्शन व प्रोत्साहन कायक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्व आसने भरल्यानंतर विद्यार्थी पायऱ्यांवर बसूनही मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक दिसत होते. दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. गणित आणि विज्ञान हे विषय अनेक विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांच्या पुढाकाराने आणि एसजी एज्युकेशन च्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने समजावणे आणि बोर्ड परीक्षेची तयारी अधिक परिणामकारक करणे हा या सत्राचा उद्देश होता. एसजी एज्युकेशन चे योगदान आणि लतेश घावट सरांची घोषणा. या कार्यक्रमात एसजी एज्युकेशनचे चे संस्थापक लतेश घावट यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी अशा काही विशेष घोषणा त्यांनी यावेळी केल्या. लतेश घावट सरांची घोषणा कल्याणमध्ये 1st येणाऱ्या विद्यार्थ्याला 'रवी पाटील फाउंडेशन’ तर्फे स्कूटर भेट दिली जाईल. प्रत्येक शाळेत 1st येणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रवी पाटील फाउंडेशन’ तर्फे टॅब दिले जाईल. गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयात 100/100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुनील वायले यांच्या वतीने 5,000 रुपये रोख बक्षीस दिले जाईल. या घोषणेनंतर सभागृहात विद्यार्थ्यांकडून जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. लतेश घावट सरांनी पुढे सांगितले “योग्य मार्गदर्शन, सराव आणि मेहनत असेल तर गणित आणि विज्ञान कोणत्याही विद्यार्थ्यासाठी कठीण राहात नाही. विश्वास आणि मेहनत यांना पर्याय नाही.”
मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या उपनेत्या विजया पोटे, विधानसभा संघटक संजय पाटील, शहरप्रमुख रवी पाटील, उपशहरप्रमुख सुनील वायले, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, महिला शहरप्रमुख नेत्रा उगले, माजी सभागृह नेते श्रेयस समेळ, युवासेना लोकसभा अध्यक्ष प्रतिक पेणकर, युवासेनेचे अभिलाष डामरे, सुनील रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा संवाद व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. “दहावीची परीक्षा महत्त्वाची आहे आणि ती सोपी व्हावी म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे. पण दहावी नंतर कोणती दिशा निवडायची हे ठरवताना इतरांचा आवाज नाही—स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. जिथे तुमची आवड आहे तिथेच तुमचे कौशल्य विकसित होते आणि यश मिळते.” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment