मुरबाड मध्ये महाविकास आघाडीला धक्का देत सुभाष पवार यांनी हजारो कार्यकर्ते समवेत भाजपा पक्षात प्रवेश !
मुरबाड (मंगल डोंगरे) : बहु प्रतीक्षेत आणि जर तर च्या प्रश्नांना पूर्णविराम देत, ठाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा टिडीसी संचालक सुभाष पवार यांनी आज गुरुवार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुरबाड मधील हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत सुभाष पवार यांनी महाविकास आघाडीला धक्का देऊन अखेर भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी ह. भ. प. रामभाऊ दळवी, प्रकाश पवार, धनाजी दळवी, विनोद नार्वेकर, किसन गिरा, प्राजक्ता भावाथे॔, चंद्रकांत सासे, नामदेव धुमाळ, बाळकृष्ण टोके, प्रकाश भाकरे, संजय पवार, रमेश टोके, प्रवीण कोर, बाळकृष्ण चौधरी, सुनील घागस, चंद्रकांत गायकर, संतोष देशमुख, अशोक भगत, संजय पवार, मनोहर ईसामे, लक्ष्मण सरनिंगे, महेश बांगर, रेखा इसमे, दीपा भला, पदमा पवार, कांचन शिंदे, विकास वारघडे, यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत सुभाष पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुभाष पवार यांनी बोलताना सांगितले की राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विकास कामांची गती पाहून तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाची घोडदौड पाहता तसेच मुरबाड तालुक्याच्या विकास कामाला चालना देण्यासाठी आज मी सर्व कार्यकर्ताच्या समवेत प्रवेश करत आहे असे बोलताना सुभाष पवार यांनी उद्गार काढले.
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यात भाजप पक्ष हा सक्षम दृष्टीने वाटचाल करणारा पक्ष ठरणार आहे, तसेच राज्यात भाजपाची व केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही सुद्धा तालुक्यात सुभाष पवार यांनी जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकल्या होत्या त्यामुळे आजच्या प्रवेशाने मुरबाड तालुक्यात सर्वच्या सर्व जागा जिल्हा परिषदेच्या आठ पंचायत समितीच्या १६ या सर्व जागा भाजप पक्ष जिंकणार यात शंका नाही. माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास कामांना दिशा देत आहेत असे शुभ संकेत कपिल पाटील यांनी दिले.
आमदार किसन कथोरे बोलताना सांगितले की सुभाष पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना किसन कथोरे यांनी शुभेच्छा दिल्या, आता खऱ्या अर्थाने मुरबाड मध्ये मोठ्या प्रमाणात भाजप आघाडीवर राहील अशा शुभेच्छा दिल्या, तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की गेल्या सहा महिन्यापासून कपिल पाटील तसेच किसन कथोरे हे सुभाष पवार यांना आणण्यासाठी व प्रयत्न करत होते आज तो प्रयत्न यशस्वी ठरला आहे त्यामुळे भाजपामध्ये सुभाष पवारांच्या प्रवेशामुळे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल तसेच मुरबाड मध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे या दोघांना एकत्र आणण्याचे काम सुभाष पवार यांनी करावं असे शुभ संकेत रविंद्र चव्हाण यांनी दिले.
No comments:
Post a Comment