Saturday, 1 November 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभ्या !!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभ्या !!

* महिला प्रदेशाध्यक्षा माया कटियार यांचा विश्वास
* पालघर जिल्हा राष्ट्रवादी महिला सेलची आढावा बैठक संपन्न

(वाडा/ दि.1 नोव्हेंबर) :

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबविल्या असल्याने आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील महिला अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रथम पसंती देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा माया कटारिया यांनी व्यक्त केला आहे. 

पालघर जिल्हा राष्ट्रवादी महिला सेल आढावा बैठक शुक्रवारी (दि.1 नोव्हेंबर) वाडा येथील ब्लॉसम रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. 

तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांनी विशेष जबाबदारी घेऊन जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्याचे आवाहनही माया कटारिया यांनी यावेळी केले आहे.

तर पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे सक्षम महिला उमेदवार असून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत जास्तीजास्त  महिला उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार यांनी व्यक्त केला. 

या आढावा बैठकीसाठी प्रदेश महिला सचिव रेखा हिरा, जिल्हा उपाध्यक्षा स्वाती राऊत, चित्रा पाटील, वाडा तालुका अध्यक्षा जान्हवी पाटील, डहाणू तालुका अध्यक्षा शर्मिला भानुशाली, पालघर तालुका अध्यक्षा कविता संखे, बोईसर शहर अध्यक्षा प्राची राऊत यांसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी डहाणू तालुका कार्याध्यक्षा पदावर ज्योती मनोहर उमतोल, वाडा तालुका उपाध्यक्ष पदावर कीर्ती किशोर हावरे तर तालुका सचिव पदावर अंकिता अनिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी शेलार यांनी तर सूत्रसंचालन जान्हवी पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...