मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, प्रस्ताव करण्याचे आवाहन !!
मुंबई, प्रतिनिधी : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी “डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या दोन्ही योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात येणार असून, इच्छूक मदरसे व धार्मिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या नमुन्यातील प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या दोन्ही योजनांसाठी कालबद्ध कार्यक्रम पुढीलप्रमाणे इच्छुक मदरसे, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२५ तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२५ अशी राहील, असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले अहे.
No comments:
Post a Comment