Friday, 14 November 2025

रेसिडेन्सीयल सोसायटीत अनधिकृत हॉटेल व्यवसायाविरुध्द पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद प्रजापती आक्रमक !!

रेसिडेन्सीयल सोसायटीत अनधिकृत हॉटेल व्यवसायाविरुध्द पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद प्रजापती आक्रमक !!

कल्याण, प्रतिनिधी : बिर्ला कॉलेज समोर विश्वनंदा हाउसिंग सोसायटी ही एक रेसिडेन्शिअल सोसायटी आहे परंतु काही घरमालकांनी आपल्या रेसिडेन्शिअल घरामध्ये कमर्शियल अनधिकृत व्यवसाय सुरू केले आहेत, त्या बिल्डिंग धोकादायक व अति धोकादायक मध्ये मोडत असून कधीही त्या कोसळण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 'ब' प्रभाग क्षेत्र तसेच अनधिकृत बांधकाम विभाग येथील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अनधिकृत हॉटेल्स सुरू आहे, या ठिकाणी भरपूर गर्दी होत‌ असून बिल्डिंगी अति धोकादायक असल्यामुळे तेथे काहीही होऊ शकते व हॉटेल व्यावसायिक यांनी रेसिडेन्सीयल घरे यात तोडफोड करुन त्यात अनेक बदल करत आपले हॉटेल्स सुरू केले आहेत या सर्व रेसिडेन्सीयल बिल्डिंगी अत्यंत धोकादायक स्थितीत पोहचल्या असून येथे कधीही दुर्देवी घटना घडली तर चालू असलेल्या अनधिकृत हॉटेल मध्ये येणारे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. 

या संदर्भात पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद प्रजापती यांनी सांगितले वारंवार ब प्रभाग क्षेत्राला तक्रार करून कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई होत नाही त्यानंतर अधिकारी यांना बऱ्याच वेळा प्रत्यक्ष भेटून सगळे हकीकत सांगण्यात आले त्यानंतर ब प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे मॅडम यांनी केडीएमसी  मुख्यालय मध्ये नेऊन अतिरिक्त आयुक्त यांची मीटिंग करून आठ दिवसात कारवाई करण्याचा आश्वासन दिले परंतु दहा दिवसांनी गेल्यावर अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी मला न भेटता उपायुक्त समीर भूमकर यांना भेटण्यास सांगितले परंतु त्यांनीही कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर मी दोन-तीन वेळा उपायुक्त समीर भूमकर यांना भेटण्यास गेलो परंतु ते मला भेटलेच नाही व मी परत सहाय्यक आयुक्त प्रीती मॅडम यांना भेटून विचारणा केली की मॅडम उपयुक्त समीर भूमकर यांची माझी भेट होत नाही तरी आपण त्या अनाधिकृत हॉटेलवर त्वरित कारवाई करावी परंतु तरीही कारवाई झाली नाही आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रीती गाडे मॅडम सहाय्यक आयुक्त यांनी स्वतः माझ्याबरोबर येऊन विश्वनंदा सोसायटी येथे असलेले बिल्डिंग नंबर एक ते दहा याची दोन्ही बाजूंनी व आत मध्ये झालेले अनाधिकृत रेसिडेन्शिअल मध्ये असलेले कमर्शियल हॉटेल यांची पाहणी केली व नुक्कड हॉटेलच्या बॅक साईटला असलेले चिकन घर आरोग्य केंद्र मधील डॉक्टर नर्स तेथील आशा आया व कर्मचारी यांना त्या अनधिकृत हॉटेल वाल्यांमुळे होणारा त्रासाबद्दल व तेथील घाणीबद्दल विचारणा केली व त्यानंतर मॅडमनी मंगळवार किंवा बुधवारी ठाम कारवाई कधी होणार त्याचे आश्वासन दिले पण पुर्ण आठवडा झाला तरी 'ब' प्रभाग क्षेत्र व महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग यांच्या कडून कोणतीही कारवाई किंवा दखल घेतली नाही असे दिसून येत आहे.

पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद प्रजापती यांच्या मते मी आज वर्षभर या संदर्भात अनेक तक्रार अर्ज देत व प्रत्यक्ष भेटून कल्पना दिली असताना फक्त वर्षभरात एकदा सहायक आयुक्त प्रिती गाडे यांनी येथे व्हिजीट देत देखावा केला आहे असे दिसून येते. कारण या ठिकाणी असलेल्या नुक्कड हॉटेल शेजारी अजून एका अनधिकृत हॉटेलचे बांधकाम सुरू आहे व त्याची सुध्दा तक्रार देवून ही थातूरमातूर दिखावा करण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई होत नाही. पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद प्रजापती यांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देत म्हणाले या पुढील आठ दिवसांत जर कारवाई नाही झाली तर मी 'ब' प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरच उपोषण करणार असून जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असे सांगीतले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...