Saturday, 15 November 2025

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम यांची "कोकण रत्न पदवी"साठी निवड !!

कोकण सुपुत्र मोहन ज.कदम यांची "कोकण रत्न पदवी"साठी निवड !!

स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                 स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कोकण रत्न पदवी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील कासार कोळवण गावचे कोकण सुपुत्र मोहन जयराम कदम यांना " कोकण रत्न पदवी " जाहीर झाली असून या पदवी समारंभाचे आयोजन शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे करण्यात आले असून, तो समारंभ संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.
             शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे कासार कोळवणचे  माजी पदाधिकारी व साई भक्त  ज्यांनी मंडळाच्या उन्नती कामासोबत अनेक विविध संस्था मध्ये कार्यरत असून महान समाजकार्याचा वसा घेतला.ज्यांनी हेच काम आयुष्यभर गावात राहून गावासाठी केले असे त्यांचे वडीलांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. याची पोच पावती  म्हणून आतापर्यंत त्यांना अनेक महत्वाच्या व मानाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. समाजात कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निःस्वार्थी पणे काम करून सर्वाना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव आज प्रसिद्ध  आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असा लौकीक असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहन जयराम कदम यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना अनेकांनी लाख लाख शुभेच्छा दिल्या असून पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो हिच, साई चरणी प्रार्थना केली आहे. मोहन कदम महाराष्ट्रात विविध संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, समाज शाखा मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी समाज प्रबोधन करत समाजातील ज्या आवश्यक नाहीत अशा काही अनिष्ठ प्रथा बंद करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.ज्याच्या पासून वेळ, पैसा वाचेल असे कार्य ते करत आहेत. लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि गरजेला घरच्या माणसासारखं धावायचं अशी ओळख मोहन कदम यांची आहे. त्यांना याकामी त्यांची पत्नी, मुले, भाऊ आणि मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभते. घरातून समाजसेवेचे मिळालेले बाळकडू आणि पत्नी, मुलांचे प्रेम या जोरावर मोहन कदम यशस्वी झाले आहेत.
                श्री. मोहन जयराम कदम हे एक अष्टपैलू-व्यासंगी सामाजिक कार्यकर्ता आणि निस्पृह- सजग पत्रकार असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना आजवर राष्ट्रीय एकता सन्मान महासोहळा,राष्ट्रीय ग्राउंड लीडरशीप आयकॉन पुरस्कार, कोकणदीप समाजरत्न पुरस्कार २०२५, एशियन टॅलेन्ट  गोल्डन अवॉर्ड सोहळा. भारतरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार, प्रेरणा फाउन्डेशन तर्फे महाराष्ट्र उत्कृष्ट समाजसेवक राज्यस्तरीय  पुरस्कार २०२५, प्रेरणा फाउन्डेशन तर्फे राज्यस्तरीय माणुसकी रत्न पुरस्कार २०२५, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय जनरत्न प्रतिक्षा भूषण पुरस्कार २०२४, धगधगती मुंबई पुरस्कार २०२३, कला साधना सोशल संस्था पुरुष उत्कृष्टता पुरस्कार २०२३,लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद राष्ट्रीय लोक कल्याणकारी सेवा रत्न पुरस्कार २०२३, कार्यदर्पण आणि इव्हेंट टी एम जी सहयोगी संस्थेतर्फे जनगौरव कार्य दर्पण आयकॉन पुरस्कार २०२२, आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद व महाराष्ट्र न्यूज १८ 'भारत श्री' नॅशनल पुरस्कार २०२२,ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटी (मुंबई   सचिव) अखिल भारतीय पत्रकार हक्क समिती : मुंबई जिल्हा प्रतिनिधी, झुंझार केसरी : मुंबई प्रतिनिधी, माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना पदभार : मीडिया हेड,आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस  कौन्शिल, भारतीय महाक्रांती सेना आणि यु .एन. न्यूज २४ संलग्न, बोला मुंबई : पत्रकार, कोकण दीप : उपसंपादक, महाराष्ट्र पत्रकार संघ : सदस्य, आदर्श महाराष्ट्र : पत्रकार, समाजसेवा रत्न पुरस्कार २०२२, ओम साई नाथ नाच मंडळ, अमरनाथतर्फे पुरस्कार, माझी वसुंधरा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन प्रमाणित प्रमाणपत्र, समाजभूषण पुरस्कार २०२२,महात्मा ज्योतिबा फुले बहूउद्देशिय सेवाभावी संस्था पुरस्कार, प्रेस इन्फाॅरमेशन ब्र्यु कोविड योद्धा सन्मान पत्र, जनशक्तीचा दबाव सन्मान पत्र, पोलीस तपास कोविड योद्धा पुरस्कार, स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठान कोविड योद्धा पुरस्कार, सत्यवादी मानवी मूल्य हक्क जोपासणारी संघटना सन्मान पत्र २०२०, भारतीय महाक्रांती सेना कोविड योद्धा पुरस्कार २०२०, आदर्श वार्ताहर कोविड योद्धा पुरस्कार २०२०, वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करोना योद्धा पुरस्कार २०२०,भारत अस्मिता राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०१९, महाराष्ट्र सन्मान पुरस्कार, शिर्डी २०१९,महाराष्ट्र हरितसेना  (महाराष्ट्र शासन) सदस्य, नॅशनल पुरस्कार २०१९, इंडियन आयकॉन अवॉर्ड २०१९, संत गाडगे महाराज समाज भूषण पुरस्कार २०१९, सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर तर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार पुणे २०१९, छत्रपती संभाजी राजे कर्तव्य गौरव पुरस्कार २०१८, मानवी हक्क राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र २०१८, राष्ट्रपिता महात्मा गांधी शांतिदुत पुरस्कार २०१८, नेताजी सुभाषचंद्र बोस भारत सन्मान पुरस्कार २०१८,कोकण रत्न पुरस्कार २०१८,महाराष्ट्र भूषण रत्न पुरस्कार २०१५ असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
                मोहन कदम यांना समाजसेवेचा वसा वडिलोपार्जित मिळाला आहे.लहानापासून आवड निर्माण झाली म्हणून जनसेवा ही ईश्वर सेवा असे समजून मी सतत काम करत असतो.लोकांचे आशीर्वाद हेच आमच्या साठी पुरस्कार आहेत असं मत मोहन कदम यांनी बोलताना व्यक्त केले.स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे, कोकण पदाधिकारी, सदस्य, सभासद व त्यांच्या निवड समितीचे आणि त्यांच्या टीम वर्क ने माझी निवड केली म्हणून त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केले. रत्नागिरी  जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावचे सुपुत्र मोहन कदम यांना "कोकण रत्न पदवी" जाहीर झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, ग्रामीण मंडळ, विविध संस्था, प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

-------------------------------
              हरी ओम रेल्वे प्रवाशी भजन मंडळाचे सल्लागार म्हणून गेली अनेक वर्षे निःस्वार्थ सेवा देणारे, सतत समाजकार्य आणि पत्रकारितेत सक्रिय राहून समाजाच्या प्रत्येक घटकाला दिशा देणारे, मान.श्री.मोहन जयराम कदम यांना त्यांच्या कार्याची दखल म्हणून “कोकण रत्न पदवी” या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे ही आपल्यासाठी, आपल्या मंडळासाठी आणि संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब आहे.त्यांचे कार्य केवळ शब्दांत मावणारं नाही पत्रकारितेतून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, सामाजिक कार्यातून दुर्बल घटकांना आधार देणे, आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यातून एकात्मतेचा संदेश देणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले आहे.
              हरी ओम रेल्वे प्रवाशी भजन मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत त्यांनी अनेक भक्तिमय उपक्रमांना प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले आणि प्रत्येक वेळी आपल्या उपस्थितीने सर्वांना प्रेरणा दिली. त्यांच्या सहवासातून प्रत्येकाला मिळतो तो संस्कार, विनम्रता आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा.अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आयुष्यातील ४७ वा पुरस्कार मिळण्याचे नामांकन जाहीर झाले आहे हे खरंच त्यांच्या सततच्या परिश्रमांचे फलित आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी क्षण आहे.मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा....!

            आपल्याला हा पुरस्कार मिळावा हीच प्रार्थना आणि आपण असाच समाजाला दिशा देत रहावा हीच अपेक्षा.

- महेंद्र करंबे
हरी ओम रेल्वे प्रवाशी भजन मंडळ परिवार 
--------------------------------------

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...