Sunday, 23 November 2025

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा चिपळूणतर्फे दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा चिपळूणतर्फे दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा चिपळणतर्फे दिनदर्शिका २०२६ चे  प्रकाशन सोहळ्याचे बुधवार दि. १०/१२/२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे सायं. ७.००वा. मान्यवर, जाहिरातदार, आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. शिवाय  त्या निमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून  कोकणात अविरत गाजत असलेले श्री राम नमन नाट्य मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळूण यांचे नमनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी शाखांच्या मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०३ वर्ष ही सामाजिक मातृसंस्था काम करीत आली आहे. संघटना जरी जातीची असली तरी काम समतेचे  आणि मानवतेच्या विचारांचे करत आहे.  समाजात पसरलेली अंधश्रद्धा निर्मुलन,  व्यसनमुक्ती, जमीन कुळकायदा, शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यावसायिक घडवणे, ओबीसी आरक्षण  तसेच राजकीय अवस्था यावर जनजागृती, कुणबी जोडो अभियान असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. 

याच शाखा चिपळूणच्या दिनदर्शिका सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात अतुलनीय सामाजिक  कार्य करणाऱ्या युवा शिलेदारांचा तसेच जेष्ठ मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.  

या विचारांची दिशा बदलणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखा अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर सरचिटणीस रणजित वरवटकर, खजिनदार अमेय खापरे आणि कार्यकारणी सदस्य यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...