“बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले उद्यान – बहिणाबाईं चौधरींच्या स्मृतिदिनाला मोठी उपस्थिती !!
डोंबिवली, प्रतिनिधी : डोंबिवली पूर्व, सुनील नगर येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालकीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात आज बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा ७५ वा स्मृतिदिन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून उद्यानात व्यायामसाठी नियमित येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सरोजिनीताई पाटील यांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीचे सदस्य श्री कृष्णा मारुती सोमार्डे सर यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांनी “कवयित्री बहिणाबाई चौधरी अमर रहें!”,
“बहिणाबाईंची लेखणी – महाराष्ट्राची शान!”
“ग्रामीण संस्कृतीची अभिमान, कवयित्री बहिणाबाई महान!”
या घोषणांनी उद्यानाचा परिसर दुमदूवून टाकला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी बहिणाबाईंचा स्मृतिदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सदर उद्यानात दररोज सकाळी ते संध्याकाळपर्यंत परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष तसेच लहान मुले व्यायाम, चालणे व खेळण्यासाठी येत असतात. नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन "कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समिती" हा व्हाट्सअप समूह तयार केला असून समितीच्या वतीने बहिणाबाईंचा जन्मदिन, स्मृतिदिन तसेच काही मोजके सण लोकवर्गणीतून साजरे केले जातात.
या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी हास्य कवियत्री व डोंबिवलीकर रहिवासी माननीय सौ. लताताई पाटील यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनातील काही संस्मरणीय प्रसंग कथन केले तसेच अनेक लोकप्रिय कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीमधील महिला वर्गाच्या वतीने लताताई पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर सदरचे उद्याना मधील पडणारा प्लास्टिकचा कचरा नित्य नियमाने उचलणारे श्री केशव करकेरा यांचा समितीचे सदस्य श्री कोटियन (दिव्यांग बांधव) यांच्या शुभहस्ते जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उद्यानामधील सर्वात ज्येष्ठ असलेल्या सरोजिनीताई पाटील यांचा देखील बहिणाबाई उद्यान व्यायाम समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अभिवादन कार्यक्रमाचे सुव्यवस्थित सूत्रसंचालन माजी नगरसेवक व सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे श्री. प्रकाश माने यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रदीप पवार, विक्रम म्हात्रे, शरदचंद्र जोशी, हेमंत बारस्कर, सार्थक चव्हाण, सौ. प्रतिक्षा माने, सौ. यशोदा करकेरा, केशव करकेरा, सुरेश भुवड, श्रीकांत काळे, शशिकला महानूर, आनंदा नेने, टी आर कुंभार, किशोर वाणी, डी बी चिरमडे, अल्फेंसा सिग्युरा, सत्यविजय साईल, हेमंत म्हापणकर, चिंतामण भडसावळे, बाबू वारके, संदीप देवकर, रघुनाथ राणे, फुलचंद माळी, संदीप शेट्टी, संगम भुजबळ, सार्थक चव्हाण, प्रमोद शेट्ये, यशोदा करकेरा, केशव करकेरा, दीपक पाटील, प्रसाद सावंत, भगवान सातपुते, निवृत्ती पाडवेकर, रेखा गुप्ता, शार्दुल जोशी, गिरीश कुलकर्णी, अक्षय शहा, ममता तिवारी, जितू ठक्कर, अर्चना शिरोडकर, वंदना झाडे, माधुरी कोरडे, श्रीकृष्ण वाणी, शैलेंद्र कमलाकर, सुनीती पुचेरकर, नंदा शाळीग्राम, मेघा ठोंबरे, गीता निवळकर, स्नेहा भोसले, मंदा ठाकूर, अनंत पाटील, परशुराम म्हात्रे, घनश्याम मालवी तसेच व्यायाम समितीचे साधारण १०० पेक्षा अधिक महिला व पुरुष सदस्य उत्साहाने उपस्थित होते.
सौजन्य - प्रकाश शांताराम माने (मा. नगरसेवक)
No comments:
Post a Comment